Home जळगाव कोरोनाला आळा घालू या, सामाजिक अंतर पाळू या ,,  टाकारखेडा गावाला खासदार...

कोरोनाला आळा घालू या, सामाजिक अंतर पाळू या ,,  टाकारखेडा गावाला खासदार रक्षाताई खडसे यांची सदिच्छा भेट

94
0

हमीद तळवी

शहरांसह ग्रामीण भागातही कोरोना संसर्गाचा प्रादुर्भाव वाढत चालला आहे. त्यामुळे लोकप्रतिनिधींच्या माध्यमातून कोरोना संसर्ग, लसीकरण आणि सामाजिक मूल्यांबाबत कृतिशील जनजागृती केली जात आहे.

खासदार रक्षाताई खडसे यांनी टाकारखेडा गावाला सदिच्छा भेट दिली. यावेळी गावातील गावकऱ्यांना कोरोना प्रादुर्भाव संसर्ग व कोविड चाचणीबाबत जागृत करण्यात आले. तसेच अजून उन्हाळा खऱ्या अर्थाने सुरु होण्याचा आहे त्यामुळे भूजल पातळी शाबूत राहण्याबत पाणी जपून वापरण्यासाठी खासदारांनी गावकऱ्यांना आवाहन केले. त्याचबरोबर गोशिंग गावातील पंचेचाळीस शिधा पत्रिका धारक नागरिकांना रेशन मिळण्याबाबत तहसीलदारांसोबत चर्चा करण्याचे आश्वासन दिले. गावकऱ्यांसोबत विविध विकास कामांवर खासदारांनी सकारात्मक संवाद साधला. यावेळी नांदुरा तालुका अध्यक्ष संतोष मुंडे, मा.तालुका अध्यक्ष निलकंठ भगत, भाजपा नेते लहू दिवाने, तालुका उपाध्यक्ष विजय पाटील, जिल्हा उपाध्यक्ष भाजयुमो बुलढाणा प्रविण पाटील यांच्यासह नांदुरा तालुका भाजपा पदाधिकारी, कार्यकर्ते आणि गावकरी उपस्थित होते.