Home रायगड कर्जत नगरपरिषदेतर्फे विनामास्क फिरणार्‍यांना मास्कचे वाटप, नगराध्यक्षा सुवर्णा जोशी यांचा पुढाकार

कर्जत नगरपरिषदेतर्फे विनामास्क फिरणार्‍यांना मास्कचे वाटप, नगराध्यक्षा सुवर्णा जोशी यांचा पुढाकार

321

 कर्जत – जयेश जाधव

कर्जत तालुक्यातील ग्रामीण भागात सध्या कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर वाढत आहे. कोरोनाबाधीत रूग्णांची संख्या वाढू लागली आहे. आरोग्य विभाग आणि प्रशासनाकडून वारंवार नागरीकांना मास्कचा वापर करा, सॅनिटायझरचा वापर करा, सोशल डिस्टन्सिंगचे पालन करावे, असे आवाहन केले जात आहे तरी अजूनही काही नागरिक बाजारपेठेत विनामास्क फिरत आहेत त्यांना जागरूक करण्यासाठी कर्जत नगरपरिषदेने मास्कचे वाटप केले.

कोरोना महामारीचा प्रादूर्भाव वाढत आहे. शासन, स्थानिक प्रशासन वेळोवेळी खबरदारीचा सूचना देत आहेत, तरीही अजून काही नागरिक विनामास्क फिरत आहेत, तर बरेच दुकानदार विनामास्क व्यापार करत आहेत, त्यांच्यात जागरूकता करण्यासाठी कर्जत नगरपरिषदेच्या नगराध्यक्षा सुवर्णा जोशी, मुख्याधिकारी डॉ. पंकज पाटील, बांधकाम सभापती स्वामिनी मांजरे, नगरसेवक बळवंत घुमरे, सोमनाथ ठोंबरे, माजी नगरसेविका बिनीता घुमरे नगरपरिषद कर्मचारी कल्याणी लोखंडे, ऋषीता शिंदे, सुदाम म्हसे, सुनिल लाड यांनी मंगळवारी सांयकाळी बाजारपेठ परिसरात मास्क न लावता जे नागरिक फिरत होते, त्यांना मास्क देऊन आपल्या कुटुंबाची काळजी घ्या असा संदेश दिला. मास्क, सोशल डिस्टंसिंग, वारंवार हात धुणे हे कसे गरजेचे आहे ते पटवून दिले.