Home नांदेड नांदेड मध्ये घडले अत्यंत धक्कादायक प्रकार” पोलिसांवरच झाले हल्लाबोल – तर या...

नांदेड मध्ये घडले अत्यंत धक्कादायक प्रकार” पोलिसांवरच झाले हल्लाबोल – तर या यंदाची होळी बेतली नांदेड पोलिसांच्याच जीवावर

460

राजेश एन भांगे

नांदेड मध्ये हुजुरसाहेब सचखंड गुरूद्वारा येथे दि. २९ रोजी सायंकाळी ५ वा. च्या सुमारास होळीच्या हल्ला बोल कार्यक्रमा निमित्ताने जमलेल्या शिख समुदायातील काही माथेफिरूंनी पोलिसांवरच हल्ला चढविल्याचा धक्कादायक प्रकार समोर आले असुन.

यावेळी पोलीस अधीक्षक यांच्यावरच तलवारीने हल्ला करण्यात आले असता त्यांचे अंगरक्षक दिनेश पांडे यांनी तो तलवारीचा वार आपल्या अंगावर घेतला त्यातच दिनेश पांडे गंभीर जखमी झाले आहेत.

सोबतच पोलिसांच्या अनेक गाड्या जमावातील काही जणांनी फोडून टाकल्या आहेत.
कोवीड नियमावली जाहीर असतांना आलेला शिमगा सण पोलिसांच्याच जीवावर बेतला.

आज गुरुद्वारामध्ये दरवर्षी प्रमाणे होळी आणि हल्ला मह्ल्ला साजरा करण्यासाठी जिल्हा प्रशासनाने अनेक बैठकांचे आयोजन केले होते. त्यात गुरुद्वारा परिसरात प्रतीकात्मक हल्ला मह्ल्ला सण साजरा करू असे सर्वानी बैठकीत सांगितले होते. त्यानुसार होळी सण साजरा झाला पण आज निघणारी हल्ला मह्ल्ला मिरवणूक आणि शिमगा पोलिसांच्या जीवावर बेतला.

दुपारी नेहमी प्रमाणे सर्व धार्मिक कार्यक्रम पार पडले.
गुरुद्वाराची सर्व गेट कुलूप लावून बंद करण्यात आली होती.

सर्व धार्मिक प्रक्रिया पार पडल्यानंतर सायंकाळी ५ च्या सुमारास काही माथेफिरू टोळक्याने तेथे संतांसोबत सुद्धा अभद्र व्यवहार करून बंद गेटचे कुलूप तोडल्याचे समजते. आणि हल्ला मह्ल्ला मिरवणूक बाहेर आली.

रस्ते सुनसान होते तरीही हल्ला मह्ल्ला मिरवणूक बाहेर आल्यावर अनेक जण त्यात सहभागी झाले.
रस्त्यावर आलेल्या मिरवणुकीत सामील असलेल्या टोळक्यातील एका समाजकंटकाने पोलीस अधीक्षक प्रमोद शेवाळे यांच्यावर तलवारीने प्रहार केला असता त्यातच त्यांचे अंगरक्षक दिनेश पांडे यांनी अत्यंत जलदगतीने मध्ये धाव घेतली आणि ती तलवार दिनेश पांडे यांच्या पाठीला चिरून गेली.

जखमेतून दिनेश पांडे यांचे फुफ्फुस दिसत होते यावरून जखमेची तीव्रता लक्षात येते आहे.
त्यांनतर अपर पोलीस अधीक्षक निलेश मोरे,विजय कबाडे,पोलीस निरीक्षक द्वारकादास चिखलीकर,संदीप शिवले यांच्यासह अनेक पोलीस अधिकारी या हल्ल्यात थोडक्यात वाचले.

पोलिसांच्या अनेक गाड्या समाजकंटकांनी पूर्णपणे फोडून टाकल्या आहेत. घडलेली घटना समजताच पोलीस उप महानिरीक्षक निसार तांबोळी, जिल्हाधिकारी डॉ.विपीन सुद्धा चिखलवाडी कॉर्नर येथे पोहचले होते. तर वजीराबाद पोलिस स्टेशन येथे गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया चालु असल्याचे समजते. तरी सध्या शहरातील परिस्थिती आटोक्यात असली तरी वजीराबाद परिसरात तणावपूर्ण शांतता असुन रात्री उशीरापर्यंत हल्लेखोरांची धरपकरड सुरू होती अशी माहिती सुत्रांकडुन कळविण्यात आले.