Home महाराष्ट्र कोरोनाच्या काळात पत्रकार,बेरोजगार,मजूर,कंत्राटी कामगार,भूमिहीन,सामान्य शेतकऱ्याच्या खात्यात दरमहा १० हजार टाका.

कोरोनाच्या काळात पत्रकार,बेरोजगार,मजूर,कंत्राटी कामगार,भूमिहीन,सामान्य शेतकऱ्याच्या खात्यात दरमहा १० हजार टाका.

392
0

नाशिक – गेल्या वर्षभरापासून कोरोनाच्या संकटात सामान्य माणूस देशोधडीला लागला आहे.सध्या कोरोनाचा कहर वाढतावाढत आहे,सगळीकडे लाँकडाऊनची तयारी,व कारवाईचा बडगा सुरू आहे.अश्यातच कोलमडून गेलेला बेरोजगार,मजूर,कंत्राटी कामगार,छोटे व्यावसायिक,भूमिहीन,अल्पभूधारक शेतकरी व ग्रामीण व शहरी पत्रकार यांची कौटुंबिक हलत गंभीर आहे,याबाबत केंद्र राज्य सरकारने कुठलीही मदत योजना या घटकांसाठी आणली नाही.परिणामी प्रशासनास वेतन आयोग,आठवडा ५ दिवसांचा कमी केला,करोडोच्या मालमत्ता असलेल्या आमदार,खासदार याना वेतन वाढवली यामुळे महाराष्ट्र राज्य मेटाकुटीस आले आहे.यासंदर्भात दिलेले निवेदन गांभीर्याने घेऊन कार्यवाही करावी,सामान्यांना विशेष पैकेज देऊन दरमहा १०,००० रुपये खात्यात जमा करावे,तसेच सक्तीची वीजबिल वसुली थांबवून वीज,घरपट्ट्या माफ कराव्या,सामान्यांवरील कर्जवसुलीचा तगादा थांबवावा,गावपातळीवरील खातेप्रमुख यांना मुख्यालयी राहण्याचे तातडीचे आदेश व्हावे अशी मागणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना निवेदन पाठवून पत्रकार संरक्षण समिती,महाराष्ट्र व ग्रामविकास संवाद मंचाने केली आहे,दरम्यान नाशिकच्या जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत हे पत्र मुख्यमंत्र्यांना पाठवण्यात आले आहे.

सध्या कोरोनाच्या रुग्णांची वाढ शहर व ग्रामीण भागात सर्वत्र वाढत आहे,यंत्रणा अपुरी पडत असतांना कोरोनाचा हा कहर जीवघेणा ठरत आहे,मृत्युदर ही कमालीचा वाढला असून कोरोनाच्या पहिल्या संकटात सावरत असताना दुसरे कोरोनाचे संकट भयानक स्वरूप धारण करीत असल्याने आधीच कोलमडून गेलेला सामान्य माणूस पुरता उद्धवस्त होण्याच्या स्थिरीत आहे.अश्या स्थितीत मरणासन्न स्थितीत जगणाऱ्या सामान्य माणसाला जगण्यासाठी कुटुंब चालवण्यासाठी राज्य शासनानवं विशेष पैकेज द्यावे,तसेच कोरोनाच्या स्थितीत सुद्धा गावपातळीवर खातेप्रमुख गावात मुख्यालयी राहत नाही,शहरात राहून गावात यावेळी येतात त्यामुळे गावाचा विकास खुंटलेला आहे,सेवा हमी कायद्याचा हा भंग होत आहे,तक्रारी करून वरिष्ठ कार्यवाही करीत नसल्याने याबाबत मुख्यमंत्र्यांनी लक्ष घालावे अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे,निवेदनावर जिल्हा ग्रामविकास संवाद मंचाचे अध्यक्ष विधिज्ञ प्रभाकर वायचळे,पत्रकार संरक्षण समितीचे राज्यउपाध्यक्ष राम खुर्दळ,गोदावरी गटारीकरन विरोधी मंचाचे निशिकांत पगारे,वारकरी सेवा समितीचे संस्थापक अमर ठोंबरे यांनी निवेदनावर सह्या केल्या आहेत.
(सोबत निवेदने)
आपला:-
राम खुर्दळ.(पत्रकार,माध्यमकर्मी)९४२३०५५८०१