Home नांदेड सारखणी ग्रामपंचायतने दिव्यांग बांधवांचा राखीव ५%निधी लाभार्थ्यांना केले वाटप.

सारखणी ग्रामपंचायतने दिव्यांग बांधवांचा राखीव ५%निधी लाभार्थ्यांना केले वाटप.

168
0

मजहर शेख

नांदेड/किनवट‌, दि. २६. :-  किनवट तालुक्यातील सारखणी ग्रामपंचायत मधील दिव्यांग बांधवांचा ५ वर्षांपासून पासून रखडलेल्या ५%/ निधी सारखणी ग्रामपंचायत च्या वतीने दिव्यांग बांधवांचा राखीव ५%निधी सरपंच सौ .वनमालाताई तोडसाम, ग्रामसेवक संतोष ताडेवार यांच्या हस्ते वाटप करण्यात आले. दि,२६ मार्च २०२१ रोजी ग्रामपंचायत येथे सारखणी ग्रामपंचायत च्या वतीने दिव्यांग बांधवांचा राखीव ५%निधी सरपंच सौ वनमालाताई तोडसाम, ग्रामसेवक संतोष ताडेवार यांच्या हस्ते 5214 रुपये प्रमाणे धनादेश 8 लाभार्थ्यांना वाटप करण्यात आले. यावेळी पत्रकार मजहर शेख, दिनेश आडे,दिव्यांग लाभार्थी व त्यांचे पालक ,तसेच ग्रामपंचायत चे कर्मचारी संजय वानखेडे, प्रकाश कांबळे,रवी चव्हाण उपस्थित होते.