Home विदर्भ महाराष्ट्रातून शेतकरी नेते शैलेश अग्रवाल ज्येष्ठ काँग्रेस नेते प्रमोद तिवारी आणि राष्ट्रीय...

महाराष्ट्रातून शेतकरी नेते शैलेश अग्रवाल ज्येष्ठ काँग्रेस नेते प्रमोद तिवारी आणि राष्ट्रीय प्रवक्ते गौरव वल्लभसह असामच्या प्रचारात

494

ईकबाल शेख – वर्धा

इस्ट इंडिया कंपनीने असाम सोबत केले तेच वेस्ट इंडिया कंपनी देशातील शेतकऱ्यांसोबत करत आहे –  शैलेश अग्रवाल

संयुक्त किसान आघाडीतील शेतकरी नेते केंद्र शासनाच्या शेतकरी विरोधी धोरणांचा प्रचार पश्चिम बंगाल, केरळ, तामिळनाडू, असाम व मेघालय या राज्यात होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकांमध्ये करणार असल्याचे ठरले आहे. शेतकरी आरक्षणाचे प्रणेते शैलेश अग्रवाल यांना काँग्रेस व आघाडीतील मित्र पक्षांच्या उमेदवारांचा प्रचार करण्यासाठी काँग्रेस कडून असाम राज्यात जवाबदारी देण्यात आली आहे. माजी मंत्री प्रमोद तिवारी, काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते गौरव वल्लभ यांच्यासह राजीव भवन गुवाहाटी येथून एका पत्रकार परिषदेतून यानेत्यांसह शैलेश अग्रवाल यांनी प्रचाराची सुरुवात केली. माजी मंत्री प्रमोद तिवारी, काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते प्रा. गौरव वल्लभ, असाम काँग्रेसच्या मुख्य प्रवक्ता बबीता शर्मा व शेतकरी नेते शैलेश अग्रवाल यावेळी संबोधित करत होते. प्रमोद तिवारी यांनी यावेळी पेट्रोल – डिझेल च्या वाढीव किंमती, काँग्रेस काळात जमविलेल्या राष्ट्रीय संपत्तींची विक्री, सी ए ए, जातीय तेढीतून राजकारण इत्यादी विषयांवर विरोधकांचा समाचार घेत या मुद्द्यांसह प्रचार करणार असल्याचे कळविले. गौरव वल्लभ यांनी हम दो, हमारे दो और जो भी मिले उसे बेच दो ही भाजपाची कार्यप्रणाली असून काँग्रेसच्या शपथ पत्रातील पाचही गोष्टी हमीपूर्वक करणार असल्याचा प्रचार पुढे नेणार असल्याचे यावेळी सांगितले.

शेतकरी नेते शैलेश अग्रवाल यांनी असाम मधील धान उत्पादक शेतकऱ्यांना दुसऱ्या राज्यांतील अडीच हजाराच्या तुलनेत फक्त एक हजार प्रति क्विंटल पर्यंतचा मिळणारा भाव तर चहा उत्पादक कंपन्यांचा वीस हजार प्रति किलो पर्यंत खपणारा चहा याविषयीची तुलना केली. हजार रुपये प्रति क्विंटलचा धान उत्पादक शेतकरी चारशे रुपये प्रति दिवसाची मजुरी देतोय परंतु वीस हजार रुपये क्विंटल ते वीस हजार रुपये प्रतिकिलो पर्यंत चहा विकणाऱ्या कंपन्या २०० रुपयेही रोजमजुरी द्यायला परवडत नाही म्हणून कोर्टात गेल्या. चहा मजूर फक्त दीडशे रुपये प्रति दिवस मजुरीवर काम करत आहेत त्यांची ३५० रुपये प्रति दिवस मिळावी इतकीच अपेक्षा आहे. राज्यातील भाजपाच्या सरकारने समोरच्या दाराने चहा मजुरांचे ५० रुपये वाढविण्याची घोषणा केली व मागच्या दारातून मित्र कंपन्यांसाठी ते परवडत नाही म्हणून कोर्टात जाण्याचा मार्ग दाखवत मजुरांचा घात केला. भाजपाच्या सरकारने मजुरांच्या हिताची दाखवत फक्त घोषणा करून जाणीव पूर्वक त्यात प्रक्रियात्मक त्रुटी ठेवत कंपन्यांची मदत केली.

चहा आसामच्या जमिनीत उगवतो परंतु त्याचा फायदा मात्र कंपन्यांना होतो, स्थानिक लोकांना त्यातून किमान वेतन इतकी मजुरीही मिळत नाही. ही व्यवस्था स्वातंत्र्य पूर्व काळात ब्रिटिश शासनाकडून करण्यात आली असून त्याकाळात चहा बागाने करारावर कंपन्यांना देण्यात आल्यामुळेच ही परिस्थिती आहे. शैलेश अग्रवाल यावेळी याचा संदर्भ घेत म्हणाले की तिन्ही कृषी कायद्यांच्या पाठीमागची भूमिकाही याच धर्तीवर असून हल्लीच्या वेस्ट इंडिया कंपनीच्या कंत्राटी शेतीमधून संपूर्ण देशातील शेतकऱ्यांची अवस्थाही असामसारखी होऊ नये यासाठीच दिल्लीचे आंदोलन सुरु आहे. असाम मधिल धान, भाजीपाला व इतर धान्य उत्पादक शेतकऱ्यांवर सत्तापक्षाच्या विचारसरणीतून निर्मित होत असलेल्या व्यवस्थेचा होणारा दुष्परिणाम व तिन्ही कृषी कायद्यांचा सर्व सामान्य जनतेवर भविष्यात पेट्रोल दरवाढीपेक्षाही होणारा वाईट परिणाम पटवून देत शेतकऱ्यांच्या हितात मतदान करण्याचे आव्हान करणार असल्याचे शैलेश अग्रवाल यांनी स्पष्ट केले.