Home नांदेड मांडवी पोलिसांनी 10 लाखाचा गुटखा केला जप्त,मांडवी पोलिसांची धाडसी कारवाई…..

मांडवी पोलिसांनी 10 लाखाचा गुटखा केला जप्त,मांडवी पोलिसांची धाडसी कारवाई…..

275
0

मजहर शेख

वाहनासह दहा लाखाचा गुटका जप्त
गुठका तस्करांचे धाबे दणाणले.

नांदेड/किनवट, दि : २५:- तेलंगणा राज्यातील आदीलाबाद येथून माहूर कडे टेम्पोने जात असलेला सहा लाख रुपये किमतीचा गुटखा काल मंगळवारी मध्यरात्री मांडवी पोलिसांनी पकडला असून एका आरोपीस अटक केली व एक आरोपी फरार आहे.या कारवाईमुळे गुठका तस्करांचे धाबे दणाणले आहे.
शेजारच्या तेलंगणा राज्यातून सारखणी व माहूर येथील गुटखा तस्कर मांडवी मार्गे नेहमी गुठका तस्करी करतात .शेजारील विदर्भात दररोज लाखो रुपयांचा गुटका या मार्गेच जाते या मध्ये मोठे रॅकेट कार्यरत आहे.काल मध्यरात्री मिळालेल्या गुप्त माहिती वरून मांडवी पोलिसांनी या मार्गावर नजर ठेवली होती. त्याप्रमाणे सुझुकी कंपनीचा छोटा हत्ती टेम्पो क्र. एम.एच. -२६- बी.इ.३९९५ या वाहनात सहा लाख बारा हजार रुपयांचा गुटका घेऊन जातांना पोलिसांनी पकडले.
चार लाख टेम्पोच्या किमतीसह दहा लाख बारा हजार मुद्देमालासह जप्त करून अन्न सुरक्षा अधिनियम २००६प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.यामध्ये आरोपी शेख अकबर शेख फकीर महंमद वय २० चालक रा.माहूर याला अटक करण्यात आली असून दुसरा आरोपी मालक जाकीर हुसेन पाशा रा.माहूर हा फरार आहे.या कार्यवाहीत सहायक पोलिस निरीक्षक मल्हार शिवरकर,पोलीस उपनिरीक्षक शिवप्रसाद कऱ्हाळे, पोलीस उपनिरीक्षक विजय कोळी, पो.का.चव्हाण, चुनोडे,लेनगुरे,मोहूर्ले यांनी परिश्रम घेतले .