Home विदर्भ तालुका आरोग्य अधिकारी देत आहेत कोरोणाला आमंत्रण

तालुका आरोग्य अधिकारी देत आहेत कोरोणाला आमंत्रण

117
0

 बलवंत मनवर

यवतमाऩ – पुसद तालुका आरोग्य अधिकारी यांच्या मार्फत एस.टी. बस स्टँड पुसद येथे मागील तीन दिवसापासून कोरोणा विषाणूची लागन तपासनीस करण्याच्या दृष्टीने बस स्टँड वरील नागरिकांची कोरोना तपासणी करण्याचे काम सुरू आहे.


नागरिकांना आजार जडला आहे का नाही याची तपासणी करीत असताना तालुका आरोग्य कर्मचारी ज्या ठिकाणी नागरिकांच्या आरोग्याची तपासणी करीत आहेत त्याच ठिकाणी वापरलेली औषधी, हॅन्ड ग्लोज, टेस्टीग किट आदी साहित्य ज्या ठिकाणी तपासणी करतात त्याच ठिकाणी फेकून जात असल्याची गंभीर बाब नागरिकांनी उघडकीस आणलेली आहे.


तालुका आरोग्य अधिकारी पुसद यांच्या माध्यमातून कोरोणा रुग्णाचे तपासणी करीत असताना ज्या साहित्याचा वापर करण्यात आलेला आहे. ती निकामी झालेले साहित्य,वापरलेली साहीत्य त्याच ठिकाणी फेकून देत आहेत.
तालुका आरोग्य अधिकारी यांच्या वतीने कोरोना संसर्गजन्य विषाणूचा प्रसार होण्यास आमंत्रण देण्याचे काम करिता नव्हे का ?अशी जनभावना व्यक्त होत आहे. ज्या ठिकाणी नागरिकांची टेस्ट केल्या जात आहे.
बस स्टॅड वर वास्तव्यास करीत जिवन जगणारे भिकारी वास्तव्यास असतात. त्यांना संसर्गजन्य आजार होण्यास तालुका आरोग्य अधिकारी निमंत्रणच देत आहे अशी नागरीका मध्ये चर्चा आहे.
संसर्गजन्य विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्याच्या दृष्टीने शासन सर्वतोपरी प्रयत्न करीत आहेत. तालुका आरोग्य अधिकारी मात्र शासनाच्या या आदेशाला हरताळ फासत असल्याची जन भावना व्यक्त होत आहे. वरिष्ठांनी या बाबीकडे जातीने लक्ष देऊन कोरोना संसर्गजन्य विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्याच्या दृष्टीने तालुका आरोग्य अधिकारी यांच्या अंतर्गत कोरोना तपासणी करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे, बेपर्वाईमुळे संसर्गजन्य विषाणूचा प्रसार होण्यास ते निमंत्रणच देत आहेत. अशा हलगर्जीपणा करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कर्तव्यात कसूर केल्याचा चौकशी करून त्यांच्यावर दंडात्मक कार्यवाही करावी. अशी मागणी होत आहे.
वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तालुका आरोग्य अधिकारी यांनासुद्धा योग्य समज द्यावी. बस स्टैंड वर तोरणा रुग्णांची तपासणी करून जे साहित्य वापरण्यात आलेली होती. ती साहित्य तिथेच फेकलेली आहे. त्या साहित्याची योग्य ती विल्हेवाट लावावी अशीही मागणी होत आहे.