Home मुंबई आईने मारले म्हणून अल्पवयीन मुलीने जन्मदात्या आईला मारून टाकले,

आईने मारले म्हणून अल्पवयीन मुलीने जन्मदात्या आईला मारून टाकले,

638

 

 

मुलगी व तिच्या प्रीयकराला अटक ,

अमीन शाह

आजकाल टीव्ही इंटरनेट च्या अतिरेका मूळे युवा पिढी चुकीच्या मार्गाने जात असून प्रेमा साठी एका अल्पवयीन मुलीने आपल्या जन्मदात्या आईस मारून टाकल्याची घटना राज्यातील उल्हासनगर येथे घडली असून या प्रकरणी विठ्ठल वाडी पोलिसांनी खुनी मुलगी व तिच्या प्रियकरास अटक केली आहे
या संदर्भात मिळालेल्या माहिती नुसार उल्हासनगर कॅम्प नं -४ , २६ सेक्शन परिसरात राहणाऱ्या ४० वर्षीय महिला १५ वर्षाच्या मुलीसह राहत होती . मध्यरात्री महिलेचा खून झाल्याने एकच खळबळ उडाली . विठ्ठलवाडी पोलिसांनी तपासाची चक्रे जलद गतीने फिरवीत त्याच रात्री २० वर्षाच्या दिलजीत यादव नावाच्या तरुणाला अटक केली . पोलिसांनी दिलजीत यादव याला बोलते केल्यावर , तो महिलेच्या अल्पवयीन मुलीचा प्रियकर निघाला . काही दिवसांपूर्वी दिलजीत यादव याने मुलीला फिरायला घेऊन जाऊन , अश्लील व्हिडीओ काढला . सदर व्हिडीओ महिलेच्या हाती लागल्यावर , संतप्त झालेल्या महिलेने मुलीला चोप देऊन मुलाला भेटण्यास विरोध केला . या प्रकाराचा मुलीला राग येऊन प्रियकराच्या मदतीने जन्मदात्या आईचा काटा काढण्याचे ठरविले .
रात्री आई झोपली असताना , मुलीने आईच्या डोक्यावर विटेचा जोरदार प्रहार केला . त्यावेळी दबा धरून बसलेल्या प्रियकर दिलजीत यादव याने घरात धाव घेऊन महिलेच्या गळ्यावर व इतर ठिकाणी चाकूने वार केले . या मारहाणीत व हल्ल्यात महिलेचा जागीच मृत्यू झाला . विठ्ठलवाडी पोलिसांनी खून झालेल्या महिलेच्या अल्पवयीन मुलीला बोलते केले असता , तिने खुनाची कबुली दिल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक कन्हैयालाल थोरात यांनी पत्रकारांना दिली . पोलिसांनी अल्पवयीन मुलीसह तिचा प्रियकर दिलजीत यादव यांना अटक केली . न्यायालयाने यादव याला २७ मार्च पर्यंत पोलीस कोठळी दिली असून मुलगी अल्पवयीन असल्याने , तिची रवानगी बाल सुधाहरगृहमध्ये करण्यात आली . याप्रकाराने परिसरात खळबळ उडाली आहे.