Home नांदेड देशाच्या निर्मितीत शहीदांचे मोठे योगदान – स. प्रीतपालसिंघ शाहू

देशाच्या निर्मितीत शहीदांचे मोठे योगदान – स. प्रीतपालसिंघ शाहू

166
0

शहीद दिनानिमित्त प्रहार जनशक्तीचे भव्य रक्तदान शिबिर संपन्न

शशिकांत गाढे पाटील

नांदेड – स्वतंत्र भारताच्या निर्मितीमध्ये शहीद भगतसिंग, राजगुरू व सुखदेव यांच्या सह अनेकांनी होतात्म पत्करलेल्या शहिदांचे मोठे योगदान असल्याने युवकांनी त्यांचा आदर्श घेत देशाला महासत्ताक राष्ट्र बनविण्यासाठी योगदान द्यावे असे आवाहन प्रहार जनशक्ती पक्षाचे महानगराध्यक्ष प्रीतपालसिंघ शाहू यांनी केले आहे.
इंग्रज सत्तेच्या विरोधात बंड पुकारले स.भगतसिंग सुखदेव व राजगुरू यांचा शहीद दिन निमित्त मंगळवार दि. 23 मार्च रोजी महाराणा प्रताप सिंह यांच्या पुतळा येथे प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने भव्य रक्तदान शिबिरास मार्गदर्शन करताना महानगराध्यक्ष प्रीतपालसिंघ शाहू बोलत होते.
पुढे बोलताना शाहू म्हणाले की स्वतंत्र भारताच्या निर्मितीमध्ये शहीदांचे मोठे योगदान असल्याने त्यांचा युवकांनी आदर्श घेऊन आधुनिक भारताच्या निर्मितीमध्ये योगदान देऊन देशाला महासत्ता बनविण्यासाठी मदत करण्याचे आवाहन त्यांनी केले. शहिदांना अभिवादन करून प्रहार जनशक्ती पक्ष व श्री गुरू गोविंदसिंगजी ब्लड बँकेच्या संयुक्त विद्यमाने रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते. या शिबिरास युवकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत मोठया संख्येने रक्तदान केले.
शिबिराच्या यशस्वीतेसाठी प्रहार जनशक्ती पक्षाचे महानगराध्यक्ष स. प्रीतपालसिंग शाहू, अजय हनुमंते, मल्लिकार्जुन चाकोते, सतीश कल्याणकर, सोनू खालसा विरेंद्र सिंग भट्टी, शिवचरण ठाकूर, शुभम हाकतेेकर, राजेश तलवारे, इरना चाकोते, अनिल गजभारे, कपिल मोरे, संतोष बोराळकर यांनी परिश्रम घेतले.