Home विदर्भ कालव्यात पट्टेदार वाघीन शावक मृतावस्थेत आढळून आल्याने उडाली खळबळ

कालव्यात पट्टेदार वाघीन शावक मृतावस्थेत आढळून आल्याने उडाली खळबळ

552
0

 सेलु तालुक्यातील केळझर येथील घटना


ईकबाल शेख

वर्धा जिल्हा सेलु तालुक्यातील केळझर येथील जंगल कामगार सोसायटीच्या शेता जवळ वाहत असलेल्या मुख्य कालव्याचे पाण्यात पट्टेदार वाघीन पडून असल्याचे सोसायटीत वीटभट्टी असलेला शुभम विष्णूजी रघाटाटे,केळझर विटभट्टीवर पायदळ जात असताना त्याच्या निदशँनाच कालव्यात म्रुत अवसथेतत असलेली वाघीन लक्षात येताच तो गावाकडे परत धावत सुटला.घटनेची माहिती मिळताच पो.पाटिल प्रकाश खंडाळे यांना दिली .

केळझर वनक्षेत्र सहाय्यक नंदकिशोर पाचपोर व कर्मचारी हे घटनास्थळी पोहोचले. सदर घटना ही आज दि.२१ मार्च चे सकाळी ७.३० वाजताचे दरम्यान उघडकीस आली. म्रुत्यूचे खरे कारण हे शवविच्छेदनचा अहवाल आल्यावरच स्पष्ट होणार असल्याचे वनविभागाच्या अधिकार्यांनी सांगीतले.
आज जिल्ह्यात ३६ तासाची संचारबंदी असल्याने बाजारपेठा बंद असल्याने लोकांची कामे ही ठप आहेत.व लोकंही घरीच आहेत. शुभम रघाटाटे हा नेहमीप्रमाणे आज सकाळी ७.३० वाजताचे दरम्यान सोसायटी मधील विटभट्टीवर पायदळ कामावर जात होता. त्याला पीर बाबा टेकडीजवळील मुख्य कालव्यात पट्टेदार वाघीन पडून असल्याचे दूरुन दिसून आले. परंतू त्याचेत कोणत्याही प्रकारची हालचाल दिसून येत नसल्याने तो म्रुतावस्थेत पडून असल्याची त्याला खात्री झाली. सदर वार्ता गावात व परिसरात वार्यासारखी पसरताच जो तो पीर बाबा टेकडीच्या पायथ्याशी असलेल्या कालव्याचे दिशेने निघाला.पाहता पाहता घटनास्थळी बघ्यांची एकच गर्दी जमू लागली.
वन विभागाच्या अधिकार्यानुसार ही मादी वाघ शावक दीड ते दोन वर्षाची आहे.याच्या उजव्या बाजूच्या मागचे,पुढचे पायावर तसेच पुठ्ठ्यावर एक खरचटल्याची खुण दिसून आली. परंतू शरिराचे अवयव जसेच्या तसेच कायम होते.यावेळी त्या म्रुत शावक मादीचे वजन घेतले असता ते ५७ किलो भरले. घटनास्थळाला वन विभागाचे विभागीय अधिकारी एस.के.त्रिपाठी नागपुर, डॉ. मयूर पावसे नागपुर,प्रभारी उपवनसंरक्षक तुषार डमढेरे वर्धा, बोर व्याघ्र प्रकल्प वनपरिक्षेत्र अधिकारी एन.आर.गावंडे,न्यू बोर वनपरिक्षेत्र अधिकारी जि.एस राठोड,वन परिक्षेत्र अधिकारी रिता वैद्य हिंगणी, संजय इंगळे तिगावकर व कौशल मिश्रा (मानज वन्यजीव रक्षक,वर्धा)यांनी भेट दिली.
शवविच्छेदन हे डाँ.मयुर पावसे नागपुर, डॉ. प्रकाश भिसेकर, पशुधन विकास अधिकारी, हमदापूर, व डॉ. मिना काळे व प्रणिता पाणतावणे,सेलु यांनी केले.