Home विदर्भ सरकार क्या समस्या सुलजायेंगी , सरकार खुद एक समस्या है – मनीष...

सरकार क्या समस्या सुलजायेंगी , सरकार खुद एक समस्या है – मनीष जाधव शेतकरी नेते

222
0

 या शेतकऱ्यांच्या आत्महत्या नसून शासन व्यवस्थेच्या माध्यमातून हत्या आहेत…!

यवतमाळ / महागाव – दिनांक 19 / 3 / 2021 — राज्यातील नव्हे तर देशातील पहिली सामुदायिक कुटुंबासह शेतकरी आत्महत्या म्हणून ज्याची शासन दरबारी नोंद झाली अशा प्रगतशील सदन शेतकरी शहीद साहेबराव करपे पाटील यांच्या 35 व्या स्मृतिदिनी वेदनेचे स्मरण या श्रद्धांजलीपर कार्यक्रमांमध्ये मार्गदर्शन करत असताना जगाचा पोशिंदाच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी महागाव तालुक्यातील चिलगव्हाण येथे सामूहिक श्रद्धांजलीचा कार्यक्रमांतर्गत एक दिवसीय उपवास आत्मक्लेश आंदोलनामध्ये मनीष भाऊ जाधव ,शेतकरी नेते यांनी केंद्र व राज्य शासनावर घणाघाती आरोप करून प्रहार केले , सरकार क्या समस्या सुलजायेंगी सरकार खुद एक समस्या है , आज या कृषिप्रधान देशांमध्ये जवळपास साडेचार लाख शेतकर्‍यांनी आर्थिक विवंचनेचा नैराश्यात येऊन आत्महत्या करून आपले जीवन संपविले आहे या शेतकऱ्यांच्या आत्महत्या नसून शासन व्यवस्थेने व बोथट यंत्रणेने नियोजित पद्धतीने प्रत्यक्ष हत्या केलेल्या आहेत शेतकऱ्यांच्या अस्वस्थतेला कारण ठरलेल्या या जीवघेणी नरभक्षी कायद्यामुळे व शासनाच्या शेतकरी विरोधी धोरणामुळे शेतकऱ्यांनचा अनास्था मुळे बळी घेण्यात आले आहे त्यांची उघड लूट या व्यवस्थेने केली आहे , घाम गाळून रक्त आठवून पिकविलेल्या शेतमालाला हमीभाव नाही कायद्याने याला संरक्षण नाही बाजारातली लूट थांबता थांबत नाही 19 मार्च 1986 हा महाराष्ट्राच्या इतिहासातील काळा दिवस म्हणून गणल्या जातो शहीद स्व साहेबराव करते करपे पाटील यांनी तत्कालीन पंतप्रधान राजीव गांधी यांना शेतकऱ्यांच्या समस्येच्या संदर्भात अवगत करून सामूहिक कुटुंबासह आत्महत्या करत या देशातील शेतकऱ्यांची विदारकता आक्रोश आपल्या कुटुंबाचं बलिदान देऊन शेतकऱ्यांना चांगले दिवस येतील यासाठी आत्महत्या केली होती शेतकरी हा कर्जबाजारी होऊन आत्महत्या करतो तर मग शासन यंत्रणेमध्ये पस्तीस वर्ष नव्हे तर स्वातंत्र्योत्तर कालखंडामध्ये शेतकरी कर्जबाजारी होऊ नये म्हणून चिकित्सक वृत्तीने शासन धोरणाचा अभाव का , धोरण घेणाऱ्या राज्यकर्त्यांना याची समीक्षा किंवा चिंतन , का करू वाटली नाही ,….?? हाच मोठा यक्षप्रश्न या कृषिप्रधान देशात निर्माण झालेला आहे , वेदनेचे स्मरण स्व साहेबराव करपे पाटील यांच्या स्मृती प्रित्यर्थ श्रद्धांजलीच्या सामूहिक कार्यक्रमाच्या निमित्ताने राजकीय व मानसिकता व सामाजिक जाणिवेतून शेतकरी विरोधी मानसिकतेत बदल होणे अपेक्षित आहे शेतकऱ्यांच्या प्रश्नांना समाधान मिळावे यासाठी राजकीय इच्छाशक्तीचा अभाव असल्याने शेतकऱ्यांच्या समस्यांची सोडवणूक होऊ शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडे कायम दुर्लक्षित पणाचे धोरण घेतल्यामुळे शेतकऱ्यांच्या आत्महत्येचे धग आक्रोश कायम आहे यामध्ये स्वर्गीय शहीद साहेबराव करपे पाटील पासून तर सुधाकर येडे , धर्मा पाटील , शंकर चायरे , दत्ता लांडगे , मोहिनी भिसे , बाळू प्रकाश मानकर ही प्रातिनिधिक स्वरूपाची महाराष्ट्रातील आत्महत्या श्रुंखला अजूनही थांबली नसून ( 35 )पस्तीस वर्षात परिस्थिती अजिबात बदललेली नाही उलट ती अधिक जास्त जटील स्वरूपात भयावह होत असल्याचे निदर्शनास येत आहे शेतकऱ्यांच्या व श्रमजीवी वर्गाच्या प्रेतावर आपली पोळी भाजणारे लोकप्रतिनिधी ज्या देशात जन्माला येतात तो देश अजुनी एक हजार वर्ष महासत्ता बनू शकत नाही हे सूर्या इतके वास्तव सत्य असून सर्वार्थाने काळजाला विस्तीर्ण करणार आहे 19 मार्च हा या कृषिप्रधान देशातील राज्यकर्त्यांच्या विरोधात मी सुतक दिन म्हणून पाळत असतो अजून किती काळ उपचाराविना आलेले मरण आम्ही स्वीकारायचे सबका साथ सबका विकास कुणाच्या वाट्याला आले अच्छे दिन असे एक नव्हे तर अनेक प्रश्न राज्यकर्त्यांना घेऊन मनात निर्माण होतात शासन कुठलेही असो , शेतकरी विरोधी धोरणाचाच शासनाचे धोरण व शेतकर्‍याचे मरण असा जणू एक पायंडा आज या महाराष्ट्र व देशाच्या संस्कृतीत निर्माण झालेला आहे शहीद साहेबराव करपे पाटलांच्या सामूहिक शेतकरी आत्महत्येने या देशातील शेतकऱ्यांच्या आत्महत्याचा वणवा पेटवून दिलेला असून आता शेतकर्‍यांनी आत्महत्या न करता आपल्या न्याय व हक्कासाठी संघटित होऊन व्यवस्थेच्या विरोधात एल्गार पुकारून सामूहिक श्रद्धांजलीच्या माध्यमातून संकल्प बद्ध होऊन शेतकऱ्यांनी निर्धार करावा असा आशावाद यानिमित्ताने मनिष भाऊ जाधव यांनी व्यक्त केला आहे ,प्रेस नोट
———–
*चिलगव्हाण येथे किसानपुत्रांनी वाहिली श्रद्धांजली*
साहेबराव करपे कुटुंबियांच्या 35 व्या स्मृतिदिना निमित्त किसानपुत्रांनी चिलगव्हाण येथे दिवसभर उपवास करून आत्महत्या केलेल्या तमाम शेतकाऱ्याना मशाल पेटवून श्रद्धांजली अर्पण केली.

*नव्या संस्थेचा संकल्प*
आत्महत्याग्रस्त कुटुंबियांच्या मुलभूत समस्या सोडविण्यासाठी व तमाम शेतकऱयांना नरभक्षी शेतकरीविरोधी कायद्याच्या गुलामीतून मुक्त करण्यासाठी ही संस्था कार्य करेल. अशी घोषणा किसानपुत्र आंदोलनाच्या वतीने चिलगव्हाण येथे उपोषणाच्या समारोप कार्यक्रमात करण्यात आली. या संस्थेच्या वतीने सर्वोच्य न्यायालयात याचिका दाखल करण्यात येईल अशी माहिती देण्यात आली.

*स्मारक*
शेतकरी आत्महत्यांकडे समाजाचे व सरकारचे लक्ष वेधण्यासाठी साहेबराव करपे कुटुंबियांचे गाव चिलगव्हाण येथे स्मारक उभे राहावे यासाठी किसानपुत्र आंदोलन सर्व शक्तीनिशी सहकार्य करेल.

*शेतकरी आत्महत्या ही राष्ट्रीय आपत्ती*
शेतकरी आत्महत्यांच्या घटना दिवसेंदिवस वाढत आहेत या बद्दल किसानपुत्र आंदोलनाने चिंता व्यक्त केली. शेतकरी आत्महत्या ही राष्ट्रीय आपत्ती असून शेतकरीविरोधी नरभक्षी कायदे रद्द करणे हे राष्ट्रीय कर्तव्य आहे असे सांगून शेतकरी आत्महत्यांबद्दल केंद्र आणि राज्य सरकार गंभीर नाही असा आरोप केला.

*नरभक्षी कायदे रद्द करा*
तीन नव्या कृषी कायद्याना किसानपुत्र आंदोलनाचा विरोध नाही पण सीलिंग, आवश्यक वस्तू, हे जीवघेणे कायदे समूळ रद्द करणे जास्त गरजेचे आहे असेही स्पष्ट करण्यात आले.

*पदयात्रा-*
औंढा नागनाथ ते चिलगव्हाण अशी 125 किमीची पदयात्रा करण्याचा निर्धार डॉ राजीव बसरगेकर, रामकिसन रुद्राक्ष, सुभाष कच्छवे आदींनी व्यक्त केला होता. त्या नुसार
‘शेतकरी सहवेदना यात्रा’ 11 मार्च रोजी औंढा नागनाथ येथून निघाली व 19 मार्च रोजी चिलगव्हाण येथे पोहचली.
नऊ दिवसांच्या या पदयात्रेत अनेक गावाना भेटी दिल्या.औंढा नागनाथला सुरुवात करून येहळेगाव करीत दिग्रस कऱ्हाळे, हिंगोली, खानापूर, कळमनुरी, मालेगाव, बाभळी, शेंबाळ पिंपरी, मुळावा, पळशी, कृषी महाविद्यालय मरसुळ, उमरखेड, सुकळी, नांदगव्हाण, बिजोरा, मुडाना, महागाव, या मार्गाने ही पदयात्रा 19 मार्च रोजी चिलगव्हाणला पोहचली.

*पदयात्रेत सहभाग*
यात डॉ राजीव बसरगेकर(मुंबई), रामकिसन रुद्राक्ष(जावळाबाजार), सुभाष कच्छवे(दैठणा परभणी), अनिल मोरे(पालघर), बालाजी आबादार(नांदेड), डांगे(नांदेड), हनुमंत पाटील(भोकर,नांदेड), आदींनी भाग घेतला.
सामाजिक कार्यकर्ते शिवाजीराव गावंडे, अजय झरकर, विजय वाकडे यांनी रस्त्यात सहभाग घेतला तसेच चितांगराव कदम (जि. प. सदस्य, नागापूर) यांनीही पदयात्रेत सक्रिय सहभाग घेतला.
चिलगव्हाणच्या गावकाऱयांनी पदयात्रेकरूंचा सत्कार केला.

*उपस्थिती* अमर हबीब ,जेष्ठ , शेतकरी नेते , डॉ ,राजीव बसगेकर , मुबई ,अनंत भाऊ देशपांडे ,पुणे मनिष भाऊ जाधव ,शेतकरी नेते , दीपक नारे, बंडू जिगरोल, संतोष अरसोड, गोपाळ पाटील, ऍड सुभाष खंडागळे, संदीप जाधव,प्रमोद जाधव,शिवानंद राठोड, शिवाजी गावंडे,गोपाल चव्हाण, विजय वाकडे, आमदार नामदेव ससाणे, डॉ विजय माने , अशोक वानखडे , लक्ष्मणराव बोरकूट पोलीस पाटील , साकीब शहा ,नगरसेवक पुसद , पुरुषोत्तम गावंडे , अनेक मान्यवरांनी सोशल डिस्टंसिंग covid-19 च्या पार्श्वभूमीवर आदर्श आचारसंहितेचे पालन करत या सामूहिक श्रद्धांजलीच्या मशाल पेटवून समारोप केले