Home नांदेड निवडणूकीच्या वादातून बावीस वर्षीय तरुणाची हत्या..!

निवडणूकीच्या वादातून बावीस वर्षीय तरुणाची हत्या..!

85
0

मजहर शेख

नांदेड च्या देगलूर तालुक्यातील बल्लुर येथील घटना.

नांदेड/देगलूर,दि : २१:-नांदेडच्या देगलूर तालुक्यातील बल्लुर येथे निवडणुकीच्या वादातून एका बावीस वर्षीय तरुणाची हत्या झाल्याची घटना शुक्रवार दिनांक 19 रोजी सायंकाळी सातच्या सुमारास घडली. याप्रकरणी पोलीस ठाण्यात दोन महिला सह आठ जणांविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ग्रामपंचायत निवडणुकीत विरोधी गटाचा प्रचार केल्याचा राग मनात धरून बल्लुर येथील 22 वर्षे युवक योगेश विश्वनाथ धर्माजी सदरील युवक ट्रॅक्टरने शेतातील कामे आटोपून गावाकडे आला असता आरोपीने त्यास ट्रॅक्टरच्या खाली उतरून तू आमच्याविरुद्ध गेलास व आम्हाला मतदान केले नाहीस असे म्हणत विटा ने व लोखंडी रॉडने डोक्यात जबर मारहाण केली यात योगेश धर्माजी या युवकाचा जागीच मृत्यू झाला दरम्यान सदरील घटनेचे वृत्त समजताच देगलूरचे उपविभागीय पोलिस अधिकारी सचिन सांगळे व वरिष्ठ पोलीस निरीक्षक भगवान धबडगे यांनी घटनास्थळी धाव घेऊन सदरील घटनेचा घटनेचा पंचनामा करून आरोपींना ताब्यात घेतले व आरोपीविरुद्ध गुन्हा नोंदण्यात आला. यावेळी निवडणुकीच्या वादातूनच् माझ्या मुलाचा खून झाला असल्याचे मयत युवकाच्या पित्याने आरोप केला आहे.