Home मराठवाडा माझे लग्न का करून देत नाही म्हणून मुलाने आई मावशी आजी वर...

माझे लग्न का करून देत नाही म्हणून मुलाने आई मावशी आजी वर कुऱ्हाडीने केला हल्ला ,

585
0

 

शिरीहरी अंभोरे पाटील ,

हिंगोली
सेनगाव तालुक्‍यातील पुसेगाव येथे लग्न का करून देत नाही,या कारणावरून एका तरुणाने आई, मावशी अन् आजी यांच्या डोक्‍यावर वार केला.यामध्ये मावशी व आजीचा मृत्यू झाला असून त्याच्या आईवर हिंगोलीच्या शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मंगलाबाई उत्तम बशिरे(42, रा.परभणी),देवकाबाई किसन पहारे (85)अशी मयतांची नांवे असल्याचे पोलिसांनी सांगितले. अनुसयाबाई नंदुलाल चऱ्हाटे यांचे पुसेगाव शिवारात शेत आहे.त्या ठिकाणी त्या त्यांची आई देवकाबाई किसन चऱ्हाटे यांच्या सोबत राहतात.तर त्यांचा मुलगा रोहिदास नंदुलाल चऱ्हाटे हा पुसेगावात राहून एका हॉटेलमध्ये तो काम करतो. मागील काही दिवसांपासून रोहिदास याने लग्न करून देण्यासाठी त्याची आई अनुसयाबाई यांच्याकडे तगादा लावला होता.मात्र त्याच्याकडे दुर्लक्ष केल्यामुळे तो रागातच होता.त्यातच त्याची मावशी मंगलाबाई उत्तम बशिरे(42,रा. परभणी)ह्या त्यांची बहिण अनुसयाबाई व आई देवकाबाई यांना भेटण्यासाठी आल्या होत्या.बुधवारी सकाळी रोहिदास याने मावशी मंगलाबाई बशिरे यांच्या डोक्‍यात कुऱ्हाडीचा वार केल्याने त्या जागीच ठार झाल्या.तर कुऱ्हाडीच्या दांड्याचा वार झाल्याने देवकाबाई पहारे ह्या गंभीर जखमी झाल्या तर अनुसयाबाई चऱ्हाटे यांच्या डोक्‍यात कुऱ्हाडीचा वार झाल्याने त्या देखील जखमी झाल्या. त्यानंतर रोहिदास याचा चुलत भाऊ व अन्य तिघांना हा प्रकार दिसला.तर रोहिदास त्यांच्याही पाठीमागे लागला.त्यामुळे ते पळून गेले.काही वेळानंतर त्यांनी परत घटनास्थळी जाऊन जखमी झालेल्या देवकाबाई पहारे व अनुसयाबाई चऱ्हाटे यांना उपचारासाठी हिंगोलीच्या शासकिय रुग्णालयात दाखल केले.मात्र उपचार सुरु असतांनाच देवकाबाई यांचा मृत्यू झाला.तर अनुसयाबाई यांच्यावर उपचार सुरु आहेत. पोलिसांनी त्याच परिसरात लपून बसलेल्या रोहिदास चऱ्हाटे यास ताब्यात घेतले आहे.या प्रकरणी नर्सी नामदेव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.