Home मराठवाडा जालना जिल्हा वकील संघाने व्यक्त केली आ.गोरंट्याल यांची कृतज्ञता

जालना जिल्हा वकील संघाने व्यक्त केली आ.गोरंट्याल यांची कृतज्ञता

138
0

जालना- लक्ष्मण बिलोरे

शनिवारी,२० फेब्रुवारी रोजी जालना शहरात आमदार कैलास गोर॔टयाल यांच्या निवासस्थानी जाऊन जालना जिल्हा वकिल संघाच्या पदाधिकाऱ्यांनी भेट घेतली.वकिल संघाच्या वास्तू उभारण्यात जे सहकार्य लाभले त्याबद्दल आ.गोरंट्याल यांचे वकील संघाच्या वतीने आभार मानले. त्याचे जे काम बाकी आहे ते लवकर पूर्ण करून देण्यात यावे अशी विनंती केली. तसेच महिला वकिलांकरिता स्वतंत्र इमारत बांधण्याकरिता आणि ई-लायब्ररी सुरू करण्यास मदतीची विनंती केल्यावर त्यांनी सर्व मागण्या पूर्ण करण्याचे आश्वासन देऊन महिला वकिलांसाठी तातडिने रक्कम रू. २० लाख रूपये आमदार फंडातून देण्याची घोषणा केली. त्याबद्दल जालना जिल्हा वकिल संघाने त्यांचे आभार व्यक्त केले. प्रसंगी जिल्हा वकिल संघाचे अध्यक्ष ॲड. संजय मधुकरराव देशपांडे, उपाध्यक्ष ॲड. राजेंद्र राऊत,सचिव ॲड.शारजा शेख, ज्येष्ठ विधिज्ञ सुरेशराव कुलकर्णी, ॲड. याकूब अली, ॲड. संजय काळबांडे, ॲड.ढवळे आदींची उपस्थिती होती..