Home विदर्भ पोलीस स्टेशन रामनगर वर्धा येथील गुन्हे प्रकटीकरण पथकाकडुन तिन जबरी चोरीचे गुन्हे...

पोलीस स्टेशन रामनगर वर्धा येथील गुन्हे प्रकटीकरण पथकाकडुन तिन जबरी चोरीचे गुन्हे उघड

306

रवींद्र साखरे

 

वर्धा –  दि.१०.०३.२०२१ रोजी सकाळी ११.३० वा दरम्यान फिर्यादी कृष्णा केशवरावजी ताकसाळे वय ८६ वर्ष, रा.साने गुरुजी शाळे जवळ हिंद नगर वर्धा हे स्टेट बँक ऑफ, इंडिया बॅचलर रोड वर्धा. येथील बँक खात्यातुन पेंन्शनचे ४९००० रू व बचत खात्या मधुन २५००० रू असे एकुन ७४००० रू काढुन एका काळया रंगाच्या बॅग मध्ये ठेवुन बँकेचे बाहेर आले व घरी जाण्यासाठी एका मुलाला सोडयासाठी सांगितले व घराजवळ उतरून पायदळ घरी जात असताना मागुन एका मोटारसायकल वर दोन अज्ञात इसमानी त्यावे जवळ येवुन त्यांचे हातातील बंग हिसकावुन पळुन गेले अशा फिर्यादीचे रिपोर्ट वरून पोस्टे रामनगर येथे अप क्र १३६/२१ कलम ३९२,३४ भा.द.वी चा गुन्हा नोंद करण्यात आला होता.

सदर गुन्हयाचे तपासात सी.सी.टी.व्ही फुटेज ची पाहणी करून आरोपीतांची चेहरे पट्टी व गुन्हयात वापरलेल्या मोटारसायकलचे वर्णनाप्रमाणे दि १८.०३.२०२१ रोजी आरोपीताचा शोध घेत असताना सदर वर्णनाचा इसम मेन रोड वर्धा येथुन मोटारसायकल ने जात असल्याचे दिसल्याने रामनगर गुन्हे प्रगटीकरण पथकाने पाठलाग करून त्याला पोस्टे वर्धा शहर समोर ताब्यात घेतले व विचारपुस केली असता आरोपीने त्याचे नाव निलेश विनायकराव गिरडकर वय ३२ वर्ष, रा.ऐकुर्ली पो.तळेगाव (टा) ता.जि.वर्धा असे सांगितले आणी गुन्हयाची कबुली दिली तसेच त्याचे सोबत असलेला दुसऱ्या आरोपी बाबत विचारपुस केली असता तो इंदिरा चौक देवळी येथे असल्याचे सांगितले वरून तेथे जावुन त्या आरोपीस ताब्यात घेतले त्याला विचारपुस केली असता त्याने त्याचे नाव चंद्रकात दशरथरावजी काटकर,वय २५ वर्ष,रा ऐकुर्ली पो.तळेगाव (टा) ता.जि.वर्धा. असे सांगितले व गुन्हयाची कबुली दिली आरोपीतांना अधिक विचारपुस केली असता पोस्टे रामनगर येथे दाखल अप.क्र ८७/२१ कलम ३९२ भा.द.वी व पोस्टे हिंगणघाट येथे दाखल अप.क २२९ / २१ कलम ३७९ भा.द. वी चे गुन्हे केले असल्याची कबुली दिली.

सदर कार्यवाही मा. पोलीस अधिक्षक श्री. प्रशांत होळकर सा, अप्पर पोलिस अधिक्षक श्री.यंशवत सोंळकी सा, उपविभागिय पोलीस अधिकारी श्री. पियुष जगताप सा. यांचे मार्गदर्शनात मा. पोलीस निरिक्षक श्री.धनाजी जळक यांचे निर्देशाप्रमाणे पोलीस स्टेशन रामनगर सपोनी संजय मिश्रा,पो.उपनि विष्णु भांडवले व गुन्हे प्रगटीकरण प्रमुख पंकज भरणे, उदयसिंग बारवाल,संतोश कुकडकर,लोभेश गाडवे, अजित सोर, अजय अनंतवार, राहुल दुधकोहळे, संदीप खरात अनिल चव्हाण धंमेद्र अकाली, निलेश करडे, विजय हारनुर सर्व नेमनुक पोलीस स्टेशन रामनगर यांनी केली