Home विदर्भ पक्ष्यांप्रती कृतज्ञता व्यक्त करा – सुनील केदार

पक्ष्यांप्रती कृतज्ञता व्यक्त करा – सुनील केदार

463

जागतिक पक्षी दिनाच्या निमित्याने सेवाग्राम आश्रमात जलपात्र वाटप कार्यक्रम.

ईकबाल शेख

 

      वर्धा निसर्गाने ज्याप्रमाणे मानवाला संवेदना दिल्या आहे. त्याचप्रमाणे पशुपक्षांना सुद्धा संवेदना दिल्या आहे. पक्षांचे या जगात अनन्यसाधारण महत्त्व आहे. परंतु आज वाढते शहरीकरण, कृत्रिम खताचा अमाप वापर, मोबाईल टॉवर मुळे पक्ष्यांचे अस्तित्व संपण्याच्या मार्गावर आहे. निसर्गाचा समतोल राखण्याकरिता मानव जातीला पक्ष्यांप्रती कृतज्ञता व्यक्त करावी लागेल असे प्रतिवचन महाराष्ट्र राज्याचे पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास,क्रीडा व युवक कल्याण मंत्री व वर्धा पालकमंत्री सुनील केदार यांनी केले.

         जागतिक चिमणी दिनाच्या निमित्ताने सेवाग्राम आश्रम येथे आयोजित कार्यक्रमात पालकमंत्री सुनील केदार बोलत होते. यावेळी प्रमुख रूपाने केरळ येथील  प्रसिद्ध पक्षीतज्ञ श्री श्रीमणनारायण, सेवाग्राम आश्रम चे अध्यक्ष श्री प्रभूजी व इतर पदाधिकारी उपस्थित होते.

                  आपल्या वक्तव्यात पालकमंत्री मंत्री सुनील केदार यांनी सांगितले की, ज्या प्रमाणे पक्षी निस्वार्थ भावनेने निसर्गाचे जतन करण्यात मदत करतात त्याच मानवजातीने सुद्धा त्यांच्या प्रति कृतज्ञता पाळली पाहिजे. हे जलपात्र आजूबाजूच्या परिसरात मोठ्या प्रमाणात लावावे असे आव्हाहन यावेळी सुनील केदार यांनी केले.

        सुप्रसिद्ध पक्षीतज्ञ श्रीमणनारायण यांनी सेवाग्राम आश्रमाकरिता पक्षांना उन्हाळ्यात पाण्याची उपलब्धता व्हावी या करिता जलपात्राचा पुरवठा केला. यावेळी श्रीमणनारायण यांनी पक्ष्यांचे  मानवजातीला व निसर्गाला काय महत्व आहे हे सांगितले.