Home विदर्भ राणी दुर्गावती आदिवासी सह.सुतगिरणीची वार्षिक सभा संपन्न.

राणी दुर्गावती आदिवासी सह.सुतगिरणीची वार्षिक सभा संपन्न.

111
0

येरला वार्ताहर

वर्धा –   राणी दुर्गावती वर्धा जिल्हा आदिवासी सहकारी सुत गिरणी येरला तालुका हिंगणघाट जिल्हा वर्धा ची वार्षिक सर्वसाधारण सभा २० मार्च रोजी हिंगणघाट तालुक्यातील येरला येथे कोरोनाचे सर्व नियम पाळून संपन्न झाली.

या सभेच्या अध्यक्षस्थानी गिरणीचे अध्यक्ष गुलाबराव पंधरे उपस्थित होते तर गिरणीचे संचालक मिलींद मसादे,सहकारी राजेंद्र बाभळे प्रामुख्याने उपस्थित होते. राज्यात एकमेव सुत गिरणी हि आदिवासी बांधवांची राणी दुर्गावती आदिवासी सहकारी सुत गिरणी वर्धा जिल्ह्यातील येरला येथे असून या गिरणीचे संचालक तथा सभासद वर्धा,चंद्रपुर तसेच यवतमाळ या तिन जिल्ह्यात आहेत.आज पार पडलेल्या या सभेला तिनही जिल्ह्यातील गिरणीच्या संचालकांनी तथा सभासदांनी उपस्थिती दर्शविली होती. तर अनेक संचालक व सभासदांनी कोरोनामुळे या सभेत ऑनलाईन सहभाग घेतला होता. दरम्यान अध्यक्ष गुलाबराव पंधरे यांनी आपल्या मनोगतातुन या गिरणी उभारणीसाठी शासनाचा एकही रुपया न घेता वित्तिय संस्थेकडून कर्ज उभारले असल्याचे यावेळी उपस्थितांना सभेत सांगुन दरम्यानच्या काळात आलेल्या अडीअडचणी बाबत त्यांनी माहिती दिली.वार्षिक सर्व साधारण सभेचे अहवाल वाचन गिरणीचे व्यवस्थापक प्रमोद कुंभरे यांनी केले.या सभेचे प्रास्ताविक गिरणीचे संचालक मिलींद मसादे,संचालन मनिष रावते यांनी तर आभार विनोद निमरड यांनी मानले.हि सभा यशस्वी रित्या पार पडावी म्हणून गिरणीचे कर्मचारी अक्षय सोमनाथे,आदेश तामगाडगे,अजय भोयर,अपर्णा ढाले,प्रविण झाडे,रवि चांदेकर,चेतन भोकरे,अतुल भोयर,भैय्या बोरकर आदींनी अथक परीश्रम घेतले.