Home परभणी राष्ट्रवादीचे धनगर समाजावरील प्रेम बेगडी – सखाराम बोबडे पडेगावकर

राष्ट्रवादीचे धनगर समाजावरील प्रेम बेगडी – सखाराम बोबडे पडेगावकर

162
0

प्रतिनिधी

राष्ट्रवादी पक्षासह त्यांच्या जिल्हाध्यक्षांचेही धनगर समाजावरील प्रेम हे बेगडी प्रेम आहे. त्यामुळे त्यांनी बँकेच्या निवणुकीसाठी अचानक पॅनल बदलताना धनगर समाजाचा नावाचा वापर करू नये अशी अपेक्षा धनगर साम्राज्य सेनेचे संस्थापक, तथा परभणी लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार सखाराम बोबडे पडेगावकर यांनी व्यक्त केली.

राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आमदार बाबाजानी दुर्रानी यांनी काल पत्रकार परिषदेत आ सुरेश वरपुडकर यांच्या नेतृत्वाखालील मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीतील धनगर, हटकर व माळी समाजाला प्रतिनिधित्व न मिळल्याले आपण भाजपच्या नेतृत्वाखाली त्यांना पॅनल ला पाठिंबा दिल्याची माहिती सोशल मीडिया द्वारी दिली. आमदार साहेबांनी कोणत्या पॅनमध्ये राहावं आणि त्यांनी पॅनल बदलावा की बदलू नये यासाठी धनगर समाजाला काही देणे घेणे नाही. पण त्यांनी धनगर समाजाला प्रतिनिधित्व न मिळाल्यामुळे आम्ही पॅनल बदलत आहोत अशी भूमिका मांडणे हे चुकीचे आहे. मुळात राष्ट्रवादी हा पक्ष व त्यांच्या जिल्हाध्यक्षांना धनगर समाज आणि त्यांच्या अडचणीशी काहीही देणेघेणे नाहीये. राष्ट्रवादी पक्ष नेतृत्वामुळे धनगर समाजाचा एसटी आरक्षणाचा प्रश्न आडून पडलेला आहे. सोलापूर विद्यापीठाच्या नामविस्तारातही राष्ट्रवादीने खोडा घातला होता .त्यानंतर नामविस्तार पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर विद्यापीठ सोलापूर असा झाला. या विद्यापीठात अहिल्यादेवी होळकर स्मारक समितीतही पक्षनेतृत्वाने आपल्या नातवाला घुसून समाजाच्या भावना दुखावल्या. समाजाचे दैवत असलेल्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचा औंढा नागनाथ येथील पुतळा अनावरण शरद पवार यांनी करायचे की उद्धव ठाकरे यांनी या अंतर्गत वादात दीड वर्ष मेनकापडात बांधून ठेवला. बहुजनांचे नेते आमदार गोपीचंद पडळकर यांच्यावरही वेगवेगळे आरोप करून त्यांना राष्ट्रवादीने पोलिसात डांबले होते एकूणच धनगर समाजाचे नेते सुरेश भुमरे हे राष्ट्रवादीत असताना त्यांच्यावर वेगवेगळे आरोप करून त्यांना राष्ट्रवादी पक्ष सोडायला भाग पाडणारे हे बाबाजानीच होते. त्यामुळे धनगर समाजाच्या नावाचा वापर बाबाजानी यांनी यांनी करू नये. आमदार महोदयांना इतकेच धनगर समाजाबद्दल प्रेम असेल तर त्यांनी आज तडकाफडकी जिल्हाध्यक्ष पदाचा राजीनामा देऊन धनगर समाजाचे नेते मारोती बनसोडे पैलवान यांच्यासारख्या कार्यकर्ताला राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष पद बहाल करावे. पंढरपूर येथील विधानसभा पोटनिवडणुकीत राष्ट्रवादीने धनगर समाजाला उमेदवारी द्यावी.तसेच परभणी येथील नव्याने मंजूर झालेल्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयास सुभेदार मल्हारराव होळकर यांचे नाव देण्यास सरकारला भाग पाडून करून आपले धनगरा वरील प्रेम व्यक्त करावे. अशी अपेक्षाही सखाराम बोबडे यांनी व्यक्त केली.