Home विदर्भ 9 मृत्युसह यवतमाळ जिल्ह्यात 526 नव्याने पॉझेटिव्ह तर 314 जण कोरोनामुक्त

9 मृत्युसह यवतमाळ जिल्ह्यात 526 नव्याने पॉझेटिव्ह तर 314 जण कोरोनामुक्त

1301

 यवतमाळ, दि. 19 : गत 24 तासात नऊ कोरोनाबाधितांचा मृत्यु झाला असून 526 जण नव्याने पॉझेटिव्ह आले आहेत. तर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या आयसोलेशन वॉर्ड, विविध कोव्हीड केअर सेंटर आणि कोव्हीड हेल्थ सेंटर येथे भरती असलेल्या 314 जणांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे.

जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागातर्फे प्राप्त अहवालानुसार मृत झालेल्या व्यक्तिंमध्ये यवतमाळ येथील 72 वर्षीय पुरुष आणि 70, 48, 11 वर्षीय महिला, दिग्रस शहरातील 41 वर्षीय पुरुष आणि दिग्रस तालुक्यातील 75  वर्षीय पुरुष, दारव्हा येथील 55 वर्षीय महिला, पांढरकवडा येथील 52 वर्षीय महिला आणि माहूर (जि.नांदेड) येथील 55 वर्षीय महिला आहे. शुक्रवारी पॉझेटिव्ह आलेल्या 526 जणांमध्ये 375 पुरुष आणि 151 महिला आहेत. यात यवतमाळातील 249, पुसद 81, दिग्रस 97, उमरखेड 24, महागाव 22, नेर 20, मारेगाव 11, कळंब 7, पांढरकवडा 3, घाटंजी 3, बाभुळगाव 2, दारव्हा 2, वणी 2, झरीजामणी 2 आणि आर्णि येथील 1 रुग्ण आहे.

            शुक्रवारी एकूण 5039 रिपोर्ट प्राप्त झाले. यापैकी 526 जण नव्याने पॉझेटिव्ह आले तर 4513 जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले. सद्यस्थितीत जिल्ह्यात 2244 ॲक्टीव्ह पॉझेटिव्ह आहे. तसेच आतापर्यंत एकूण पॉझेटिव्ह रुग्णांची संख्या 23740 झाली आहे. 24 तासात 314 जण कोरानामुक्त झाल्यामुळे जिल्ह्यात बरे झालेल्यांची एकूण संख्या 20956 आहे. तर जिल्ह्यात एकूण 540 मृत्युची नोंद आहे.

            सुरवातीपासून आतापर्यंत 220958 नमुने पाठविले असून यापैकी 210809 प्राप्त तर 10149 अप्राप्त आहेत. तसेच 187069 नागरिकांचे नमुने आतापर्यंत निगेटिव्ह आल्याचे जि.प. आरोग्य विभागाने कळविले आहे.