Home परभणी जगभरातील मुस्लिम समाजाच्या धार्मिक भावना दुखावल्या बद्दल पालम पोलीस स्टेशन येथे वसीम...

जगभरातील मुस्लिम समाजाच्या धार्मिक भावना दुखावल्या बद्दल पालम पोलीस स्टेशन येथे वसीम रिजवी वर योग्य त्‍या कलमान्‍वये गुन्‍हा दाखल करण्याची ( AIMIM) पक्षाची मागणी

384

पालम – प्रतिनिधी

ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन पक्षातर्फे पालम पोलीस स्टेशन येथे पोलीस निरीक्षक शिंदे साहेब यांना निवेदन सादर करून दिलेल्या तक्रारीत म्हटले की दि.11/03/2021 रोजी लखनऊ उत्तर प्रदेश येथील राहणारे शिया वक्फ बोर्डाचे माजी सदस्य वसीम रिजवी यांनी सुप्रीम कोर्टात एक याचिका दाखल करून जगभरातील सर्वात पवित्र धर्मग्रंथ कुराण शरीफ मध्ये बदल करून त्याच्यात असलेले आयात 26 आयात (sentence) वगळण्यात यावी अशी मागणी केली. त्याच्या या याचिकेला सुप्रीम कोर्ट अॅडमिट न करता फेटाळून लावतील यात शंका नाही.मात्र आज तक न्यूज चैनल चा रिपोर्टला बाईट देताना सांगितले की कुरान हे आतंकवादची शिकवण देतो‌ व इस्लाम धर्मातील सुरुवातीचे तीन खलिफा यांनी ताकतीचा प्रयोग करून इस्लामचा फैलाव केला असे दूष प्रचार करून इस्लाम धर्माची छवी मलीन करण्याचे काम त्यांनी केले आहे.असा षड्यंत्र रचून त्यांनी तशी बाईट आज तक न्यूज चैनल वर देऊन आमच्या
धार्मिक भावना दुखावल्या बद्दल आम्ही वसीम रिजवी याच्याविरुद्ध कायदेशीर तक्रार दाखल करीत आहे. तरी वसीम रिजवी विरुद्ध भा.द.वि.ची कलम *295,295A,296,298,* व आयटी ॲक्ट प्रमाणे व इतर ॲक्ट प्रमाणे पालम पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात यावा अन्‍यथा नाइलाजास्‍तव ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन पक्षातर्फे पालम पोलीस स्टेशन समोर धरणे आंदोलने, निदर्शने करण्यात येतील या निवेदनावर ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन पक्षाचे पालम तालुका प्रभारी अध्यक्ष अनिस भाई कुरेशी, शहराध्यक्ष अडवोकेट अझरुद्दीन खतीब साहब, सादात खान साहब, कुरेशी जुनेद, सय्यद फारुख,कुरेशी बाबू, समीर पठाण, शेख इसहाक आदीसह कार्यकर्ते उपस्थित होते.