Home जळगाव मयूर अटावलकर यांची कांदा उत्पादक संघटनेच्या रावेर युवा अध्यक्ष पदी निवड..

मयूर अटावलकर यांची कांदा उत्पादक संघटनेच्या रावेर युवा अध्यक्ष पदी निवड..

712

रावेर (शरीफ शेख)

रावेर विधानसभा क्षेत्रातील शेतकऱ्यांचे न्याय व हक्कासाठी तसेच निराधार व अपंगांसाठी झटणारे दिव्यांग सेल अध्यक्ष श्री मयुर दिगंबर अट्रावलकर, कुंभारखेडे यांची दि,१४/०३/२०२१ रोजी महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष श्री भारतजी दिघोळे साहेब यांच्या हस्ते संघटनेच्या रावेर तालुकाध्यक्ष पदी निवड झाली.
संघटनेचे संस्थापक अध्यक्ष श्री. दिघोळे साहेब तसेच राज्य प्रवक्ते श्री. शैलेंद्र पाटील यांनी रावेर यावल विभागातील कांदा उत्पादन वाढविणे आणि येथील शेतकऱ्यांना उत्तम दर तसेच बाजार उपलब्ध करून देण्यासाठी श्री.मयुर अट्रावलकर (सर) यांच्या कार्यावर विश्वास दाखवून सदर नियुक्ती केली आहे. आणि शेतकऱ्यांना आवश्यक असलेले कांदा पिकाविषयी उदा. बियाणे, लागवड, खते तसेच बाजार याविषयी माहिती हवी असल्यास २४ x ७ संपर्क करावा, त्यांच्या सर्व गरजांचे निराकरण केले जाईल असे आवाहन संघटनेचे तालुकाध्यक्ष या नात्याने श्री. मयुर अट्रावलकर यांनी शेतकऱ्यांना केले आहे.