Home विदर्भ महिला व बालकांच्या सुरक्षेसाठी रक्षादीप…!

महिला व बालकांच्या सुरक्षेसाठी रक्षादीप…!

100
0

अमरावती ‌- जिल्ह्यातील महिला व बालकांच्या सुरक्षेच्या दृष्टीनं आता पोलिस विभागाकडून “रक्षादीप मोबाईल व्हॅन”हा उपक्रम सुरू करण्यात आला असून आज १२ मार्च रोजी महिला व बालविकास मंत्री तथा जिल्ह्याच्या पालकमंत्री यशोमतीताई ठाकुर यांच्या हस्ते हिरवी झेंडी दाखवून याचा शुभारंभ करण्यात आला.

सामाजिक बदनामीची भीतीमूळे अनेक महिला अत्याचार सहन करतात पण याबात बोलत नाहीत.त्यामुळं महिलांचा छळ करणारे निर्ढावतात.बालकांच्या अत्याचार प्रकरणी नेमकं हेच होत.अशा प्रकाराला वेळीच विरोध झाला तर असे विकृत प्रकार रोखण्याला मदत होईल.अस मत पालकमंत्री यशोमतीताई यांनी यावेळी बोलतांना मांडलं.तसेच या उपक्रमाच्या माध्यमातून महिलांमध्ये आत्मविश्वास निर्माण होऊन,खंबीरपणे त्या याला विरोध करतील,अन जेव्हा असा प्रसंग आला त्यावेळी पोलिस विभागाची त्या निःसंकोचपणे मदत घेतील, हा विश्वास त्यांच्यामध्ये निर्माण झाला तर अत्याचाराच्या घटनांना आळा बसेल असा आशावाद त्यांनी यावेळी व्यक्त केला.