Home रायगड पत्रकार जयेश जाधव यांच्या विरोधात खोटी अॅट्रासिटी उच्च न्यायालयाकडून अटकपूर्व जामीन मंजूर

पत्रकार जयेश जाधव यांच्या विरोधात खोटी अॅट्रासिटी उच्च न्यायालयाकडून अटकपूर्व जामीन मंजूर

163
0

कर्जत ,  (प्रतिनिधी) – कर्जत येथील पत्रकार जयेश जाधव यांच्या विरोधात षंडयंत्र रचून उल्हासनगर सेंट्रल पोलिस स्टेशनमध्ये दाखल केलेल्या तक्रारी अर्जावरून पोलीसांनी कुठल्याही प्रकारची चौकशी व तपास न करता ॲट्रॉसिटीचा खोटा गुन्हा दाखल करण्यात आला असून याबाबत पत्रकार जाधव यांनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेऊन अटकपूर्व जामिनासाठी अर्ज दाखल केला असता त्यांना अटकपूर्व जामीन मंजूर केला असून पोलिसांनी या प्रकरणी योग्य तपास व चौकशी करण्याचे आदेश दिले असून लवकरात लवकर तपास पुर्ण करुन चौकशीचा अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले आहेत.

याबाबत माहिती अशी की , उल्हासनगर येथील प्रेस बाजारपेठेत ओमकार डीटीपी सेंटर या दुकानातून दरवर्षी पत्रकार जयेश जाधव यांच्या दिवाळी अंकाचे डीटीपी व छपाई करण्याचे काम प्रकाश जाधव यांच्याकडे करीत असतात.परंतू जयेश जाधव हे कर्जतमधील प्रतिष्ठित पत्रकार असल्याचे माहीत असूनसुद्धा जाणीवपुर्वक आकसापोटी त्यांच्या विरोधात खोट्या व बदनामीकारक चुकिच्या बातम्यांच्या डीटीपी करून न्युज पेपर बनविण्याचे काम ओमकार डीटीपी सेंटरमध्ये त्याचा लहान भाऊ राकेश जाधव अनेक दिवसांपासून करीत होता तसेच कर्जतमधील बंद पडलेल्या पाक्षिकात या बातम्या प्रसिद्ध करून विविध वाॅट्सअप ग्रूपमधे वायरल करून नाहक बदनामी करीत होता. याप्रकरणी पत्रकार जाधव यांनी कर्जतमधील बंद पडलेल्या ग्राहक विकास पाक्षिकाचे प्रकाशक प्रभाकर असावले विरोधात कर्जत पोलिस ठाण्यात भा.द.वि कलम ५००,५०१ अन्वये गुन्हा दाखल केला आहे.
पत्रकार जयेश जाधव यांच्या विरोधात बदनामीकारक चुकीच्या खोट्या बातम्या व खोडसाळ बदनामीकारक मजकूर विरोधकांनी व राकेश जाधव यांनी ज्या ज्या ग्रुपमध्ये वायरल केला त्या ग्रुपमध्ये समर्पकपणे उत्तर जाधव यांनी दिले.या गोष्टीचा राग मनात ठेवून पत्रकार जयेश जाधव यांचे चारित्र्य हिन करण्याच्या हेतूने व खोटी बदनामी करण्यासाठी प्रकाश जाधव यांनी सुडबुध्दीने कटकारस्थान षंडयंत्र रचून जाणीवपूर्वक अॅट्रासिटीची तक्रार दाखल केली आहे . तक्रारदार प्रकाश जाधव यांच्याशी पत्रकार जयेश जाधव यांचा कुठलाही वाद, विवाद भांडण, अशा कुठलाही प्रकार अथवा घटना घडलेली नाही??? तरी ही जातीयवादी शिवीगाळ केल्याचा खोटा आरोप केला आहे??? तो कुणाच्या सांगण्यावरून??? याशिवाय भावाच्या बातमीचा राग मनात धरून अॅट्रासिटी केसमध्ये वळणं लावलं आहे का? अशी चर्चा सुरू आहे .तरी या तक्रारीचा अधिक तपास सहायक पोलिस आयुक्त डी.डी.टेळे करीत आहे.