Home परभणी धानोरा काळे येथील नवीन पुलाच्या कामासाठी गोदावरी नदी पात्रातून सोडावे लागणारे पाणी...

धानोरा काळे येथील नवीन पुलाच्या कामासाठी गोदावरी नदी पात्रातून सोडावे लागणारे पाणी सध्याच सोडण्यात येऊ नये-अनिस भाई खुरेशी

138
0

परभणी/प्रतिनिधी

ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन (AIMIM) पक्षाच्या पालम शाखेच्यावतीने जिल्हाधिकारी साहेब यांना ई-मेल द्वारे निवेदन सादर

पालम तालुक्यातील गोदावरी नदी पात्रात मौजे धानोरा काळे येथील नवीन पुलाचे उर्वरित काम करण्यासाठी डिग्रस बंधाऱ्यातून पाणी सोडावे लागणार आहे.यासाठी शासन स्तरावर हालचाली सुरू असून गोदावरी नदीच्या पात्रात दिग्रस बंधाऱ्यात ह्या वर्षी 47 दलघमी पाणीसाठा होता मागील पंधरा ते एक महिन्या खाली नांदेड शहरासाठी आरक्षित पाणी होते ते पाणी सोडण्यात आले आणि पुन्हा आता पुलाचे काम करण्यासाठी पुन्हा आणखी पाणी सोडले जाणार असल्याने सध्या 97 पालम/गंगाखेड/पूर्णा मतदार संघात मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.शेतकऱ्यांनी नवीन ऊस लागवड केली आहे.या मतदार संघातील शेतकऱ्यांचा ऊसाला पाणी देण्यासाठी गोदावरी नदी पात्रातून ऊसाला व शेतीच्या इतर लागवडीसाठी पूर्ण उन्हाळा भर
डिग्रस बंधाऱ्यातील बॅकवॉटरचा व पाण्याचा सहारा घ्यावा लागत असतो व पिण्याच्या पाण्याचा प्रश्‍न ही मिटत असतो.सालभर जाईन एवढा पाणीसाठा उपलब्ध व्हावा यासाठी शेतकरी मोठ्या चिंतेत आहेत धानोरा काळे येथील नवीन पुलाचे गोदावरी पात्रात काम सध्या रखडलेले आहे.उभ्या पिलर चे काम करण्यासाठी किमान एक महिना शेतकऱ्याला मुभा देण्यात यावी व एक महिन्या नंतर गोदावरी नदीपात्रातील नवीन पुलाचे काम तातडीने सुरू करावे सध्याची परिस्थिती पाहता सध्याच पाणी न सोडता एक महिन्यानंतर सोडावे व नवीन पुलाचे तातडीने काम सुरू करण्यासाठी संबंधित विभागाला आदेशित करावे करिता ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन (AIMIM) पक्षाच्या पालम शाखेच्या वतीने जिल्हाधिकारी साहेब परभणी यांना ई-मेल द्वारे निवेदन सादर करण्यात आले. या निवेदनावर AIMIM पक्षाचे पालम तालुका प्रभारी अध्यक्ष अनिस भाई खुरेशी यांची स्वाक्षरी आहे.