Home विदर्भ – काय आहे नेमके वाळू माफियांचे , पोलिस व महसुल कनेक्शन…!

– काय आहे नेमके वाळू माफियांचे , पोलिस व महसुल कनेक्शन…!

387
0

 गृहमंत्र्यांचे आदेशाला महसुल व पोलीस प्रशासनाकडुन ठेंगा

ईकबाल शेख

वर्धा –  काहि महिन्या आगोदर वर्धा येथे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी घेतलेल्या कायदा व सुव्यवस्था आढावा बैठकीत महसुल व पोलीस प्रशासनाने जिल्हातील रेती चोरीला लगाम लावुन कठोर कारवाई चे निर्देशन दिले आहे परंतु त्यांच्या त्या आदेशाला महसुल व पोलीस प्रशासनाकडुन ठेंगा दाखविल्याचे रात्रीच्या सुमारास जेसीबी, पोकलेन, यांत्रिक बोटी अशा यंत्रांच्या मदतीने नदीपात्रातील

होत असलेल्या रेती चोरीवरुन निदर्शनात येत आहे.

महसुल विभाग व पोलिस प्रशासन विभागच्या आशिर्वादाने रेती तस्करीचा गोरखधंदा सुरु अहे. हिंगणघाट, देवळी, पुलगाव येथील काहि घाटांवरुन रात्रभर टिप्परच्या सहाय्याने वाळूची अवैध वाहतुक केली जाते व शासनाचा महसुल बुडविला जातो. महसुल आणि परिवहन विभागाच्या संयुक्त पथकाने कडक कारवाई करावी तसेच टोल नाक्यावर सि सी टिव्हि कँमेर्यानी रेतीच्या अवैध वाहतुकिवर नजर ठेवावी दंडाच्या रकमेसह जप्तीची कारवाई करावि असे निर्देश गृहमंत्री अनिल देशमुख यांनी नुकतेच दिले होते.

सीसीटीव्ही चुकविण्यासाठी खटाटोपवर्धा-यवतमाळ मार्गावरील टोल नाक्यावर सीसीटीव्ही बसविण्यात आले आहे. याच सीसीटीव्हीत वाळू भरलेल्या वाहनांचे चित्रिकरण होऊ नये म्हणून वाळू माफिया आपली वाळू भरलेली वाहने कोल्हापूर (राव) मार्गाने नियोजित ठिकाणी नेत असल्याचे बोलले जात आहे. कोल्हापूर (राव) मार्गावरील तोडलेले बॅरिगेट्स दुरूस्त करून त्या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरा बसविल्यास वाळू माफियांचे पितळ उघडे पडेल, हे तितकेच खरे.

स्थानिक प्रशासनापासून ते मंत्रालयापर्यंत या तस्करांचे धागेदोरे असल्याने रेती तस्करी उघडपणे केली जात आहे. त्यांच्यावर कारवाई करण्याची ताकद जिल्हा प्रशासनात उरली नसल्याचे? सध्या तरी होत असलेल्या तस्करी वरून दिसून येत आहे.