Home विदर्भ कवठा कडु येथे अठरा वर्षीय तरुणीचा विहीरीत पडुन मृत्यू

कवठा कडु येथे अठरा वर्षीय तरुणीचा विहीरीत पडुन मृत्यू

252
0

चांदूर रेल्वे – हनुमंत मेश्राम

अमरावती / चांदुर रेल्वे :तालुक्यातील कवठा कडु येथील वृषाली श्रीकृष्ण मारोटकर, वय १८ हिचा दि.८ला सायंकाळी साडे चार वाजताच्या दरम्यान विहीरीत पडल्याने
पाण्यात मृत्यु झाला काही वर्षापासुन मनोरुग्ण बिमारीचा इलाज चालु होता.शासकीय दवाखान्यात इलाज होता.वडीलाची गरीबीची परिस्थिती असल्यामुळे पाहीजे तसा
इलाज शक्य झाला नाही.विशेष म्हणजे वृशाली मागीलवर्षी बारावीत चांगल्या प्रकारे मार्क घेऊन पास झाली.पण कधी कधी प्रकृती जास्तच गंभीर होत असल्याने व्हायची.
मात्र काल सायंकाळी घराच्या नजिकच्या शेत शिवारात विहीरीजवळ कडेला उभी दिसली .
पण तीच्या पर्यंत पोहचण्याआधीच विहीरीत पडली लगेच गावकर्यांनी वृशाली ला बाहेर काढले पण ती मृतावस्थेत आढळून आली.लगेच घटनेची माहिती नातेवाईकांनी पोलीसांना दिली.व तीला शेवच्छदने करीता चांदुर रेल्वे ला नेण्यात आले. वृशाली च्या अचानक मृत्यू ने परीसरात शोककळा पसरली.