Home मुंबई जीवन ज्योत सामाजिक सेवा संस्था च्या वतीने पूजा चव्हाण यांना श्रद्धांजली वाहण्यात...

जीवन ज्योत सामाजिक सेवा संस्था च्या वतीने पूजा चव्हाण यांना श्रद्धांजली वाहण्यात आली

619


करूना धनंजय मुंडे व प्राचार्य अर्चना जांगुस्टे यांनी आपले मनोगत व्यक्त केले

मुंबई प्रतिनिधी : रवि गवळी

पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरण महाराष्ट्रमध्ये गाजत असताना सध्या चर्चेत असलेले नाव करुणा धनंजय मुंडे यांनी राज्य शासनावर कडाडून टीका केली. त्यांनी यावेळी महाराष्ट्र मधील होत असलेल्या महिलांवरील अन्याय अत्याचार विरोधात नव्याने बंड पुकारलेला आहे महाराष्ट्र सरकारला त्यांनी धारेवर धरलं त्यांनी आमच्याशी बोलताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे प्रमुख मागणी केली आहे की पूजा चव्हाण या तरुणीची आत्महत्या नसून ही हत्या आहे पूजा चव्हाण ने आत्महत्या का केली यांचा उलगडा होण्यासाठी सीबीआय चौकशीची मागणी केली आहे यावेळी त्यांनी देशांमधील महिलेवर नेहमी अत्याचार होत असल्या मुळे अन्याय अत्याचाराविरोधात महिलांना आवाहन केले आहे की अन्याय अत्याचार सहन न करता त्यांनी अत्याचाराविरुद्ध मध्ये बंड करून लढण्याचे सामर्थ्य दाखवले पाहिजे व ज्या महिलाना त्रास होतो आणि अत्याचार होतात अशा महिलांच्या सहकार्यासाठी जीवन ज्योत सामाजिक सेवा संस्थेच्या वतीने संपूर्ण राज्यभर मोठी जनआंदोलन उभं करणार ज्या महिलांवर अन्याय अत्याचार होतात त्यांना पुरेसे पाठबळ नाही अशा महिलांसाठी जीवन ज्योत सामाजिक संस्थेच्या वतीने त्यांना सहकार्य केले जाईल यांचे नेतृत्व महिला अध्यक्ष या नात्याने व संस्थापक अध्यक्ष पत्रकार रवी गवळी हे करतील ज्या महिलांवर अन्याय अत्याचार होईल त्यांनी जीवन ज्योत सामाजिक संस्थे कडे संपर्क करून आपल्यावर होणारे अत्याचाराबद्दल आम्हला कळवावे त्यानंतर आम्ही त्यांना पुरेपूर मदत करू असे आव्हान नेहमी चर्चेत असलेली करुणा धनंजय मुंडे यांनी केले.यावली प्रोफेसर अर्चना जंगुस्ते यांनी संपूर्ण महिला ला विविध क्रांतिकारी महिलेचे उदाहरण देऊन त्यांना आव्हान केले की जर तुमच्यावर अन्याय अत्याचार होतात मुकाट्याने सहन न करता अन्यायाविरुद्ध बंड करून उठा या देशांमध्ये स्त्रियांना पूजले जाते त्याच देशांमध्ये स्त्रियांना पायाची धूळ समजले जाते संविधानाने महिलेला खूप मोठा स्वातंत्र्य देण्याचे काम केलेले आहे हे स्वतंत्र डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी स्त्रियांना पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून काम करण्यासाठी दिलेला आहे कुठलाही भेदभाव न ठेवता महिलेने ज्याप्रमाणे पुरुषासोबत खांद्याला खांदा लावून काम करतात त्याच प्रमाणे ज्या ठिकाणी अन्याय अत्याचार होतो त्या ठिकाणीही बंड करायला पाहिजे स्त्रियांनी पुरुषाची मक्तेदारी नसून ज्या प्रमाणे पुरुषाला आई,बायको,बहीण हवी असते तर जेव्हा ते स्त्रियावरती अत्याचार करतात तेव्हा त्यांना आई बहीण का दिसत नाही त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये स्त्रियांनी कोणाचीही गुलामगिरी न करता आपलाही समाजामधील एक वेगळा ठसा उमटवण्याचा प्रयत्न करावे याप्रमाणे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितले आहे “जुलूम करणे वालोसे ज्यादा जुलम सहनेवला”गुन्हेगार होता हे अश्या शब्दात आपले मनोगत व्यक्त केले.या वेळी विविध क्षेत्रातील मान्यवर पुढील प्रमाणे उपस्थित होते, करुणा धनंजय मुंडे,प्रोफेसर अर्चना जगुस्ते,गौरी पाटील,शोभा पाटील, जीवन ज्योत सामाजिक सेवा संस्था तथा पत्रकार संरक्षण समिती मुंबई अध्यक्ष पत्रकार रवी गवळी, पत्रकार सिद्धार्थ काळे,जय भारत तिवारी, डॉ.रचना फाडिया,नंदिनी विश्वकर्मा,प्रियंका गवळी,अलीशा येलवे,दत्ताराम गोरड, इत्यादी मान्यवर उपस्थित होते.