Home विदर्भ घाटंजी येथील बसस्थानक चौकात शिवाजी महाराज जयंती उत्साहात साजरी..!

घाटंजी येथील बसस्थानक चौकात शिवाजी महाराज जयंती उत्साहात साजरी..!

122
0

अयनुद्दीन सोलंकी

घाटंजी / यवतमाळ :- शहरातील बसस्थानक चौकात शिवाजी महाराज यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. सदरची जयंती विश्वरूप फाऊंडेशनच्या कार्यकर्त्यांनी मोठ्या उत्साहात साजरी केली.


▶️ या प्रसंगी सुनिल नगराळे म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्म 19 फेब्रुवारी 1630 रोजी झाला आहे. शिवाजी महाराज हे मराठा साम्राज्याचे संस्थापक होते. भोसले कुळातील या राजाने विजापूरचा आदिलशाही विरुद्ध आणि मोघल साम्राज्या विरुद्ध संघर्ष करुन मराठा स्वराज्य स्थापन केले. राजगड ही राजधानी असलेले स्वतंत्र मराठा राज्य शिवाजी महाराजांनी उभे केले. इ. स. 1674 मध्ये शिवाजी महाराजांचा छत्रपती म्हणून राज्याभिषेक करण्यात आल्याचे प्रतिपादन सुनिल नगराळे यांनी केले. ते आपल्या अध्यक्षीय भाषणात बोलत होते.
▶️ या प्रसंगी घाटंजी येथील महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन विभागाचे एस. टी. बस स्थानक प्रमुख श्री. लांजेवार (आयोजक रमाई जयंती), सुरेश जाधव हे प्रामुख्याने उपस्थित होते. तर विशेष अतिथी म्हणून डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समितीचे अध्यक्ष विजय गजबे हे आवर्जून उपस्थित होते.
▶️ या कार्यक्रमाचे आयोजन संजय घुसे, मोहन पेटेवार सह ईतरांनी केले. कार्यक्रमाचे संचालन जितेंद्र मुनेश्वर यांनी केले, तर आभार सुजल भालेराव यांनी मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संतोष ओंकार, शुभम नगराळे आदींनी अथक परिश्रम घेतले. या वेळी कार्यक्रमाला मोठ्या संख्येने नागरीक उपस्थित होते.