Home विदर्भ कर्ज देन्याचे आमिष दाखुन केली फसवणुक.

कर्ज देन्याचे आमिष दाखुन केली फसवणुक.

253
0

आर्वी पोलिसांची दमदार कामगिरी, आरोपिला फेसबुक डी. पी ठेवणे पडले महागात.

ईकबाल शेख

वर्धा – वर्धा जिल्हा आर्वी तालुका येथील सावलापुर येथे बचत गटाच्या १‍१ महिलांना कर्ज देण्याचे आमिष दाखवून दोन महिला व एक पुरुष गावात आले व विराट महिला सोसायटि नागपुरचे कर्मचारी असल्याबाबत सांगुन त्यानी गावातील महिलांना गट तयार करायला सांगुन कर्ज उपलब्ध करुन देतो असे सांगितले व ११ महिलांनी गट तयार केला व प्रत्येकी महिलेकडुन १ हजार रु प्रमाणे पँन कार्ड व गोमास्ते काढन्यासाठी ११ हजार जमा केले.

ज्याना ५० हजार कर्ज पाहिजे त्याचे कडुन ४ हजार व ज्याना १ लाख त्याचे कडुन ८ हजार रु प्रोसेसिंग फी म्हणुन भरावी लागेल व कर्जाचे पैसे खात्यात जमा होईल असे सांगुन अनोळखि ईसम फरार झाले लोनच्या पैशाची वाट पाहत गावकरी पैशे खात्यात न जमा झाल्याने त्यांचि फसवणुक झाली लक्षात येतातच आर्वी पोलिस स्टेशनला धाव घेत याबाबत गुन्हा नोंद केला.

या प्रकरणी पोलिसांनी तपासा दर्मयान तीन आरोपींना अटक करून एक आरोपी अजून पर्यंत फरार आहे या प्रकरणात आरोपींची संख्या मोठ्या प्रमाणात असून सदर प्रकरणात आरोपींनी विदर्भातील अनेक गावात बचत गटाच्या महिलांसोबत फसवेगिरी करून प्रत्येक गावातून हजाराे रुपयची रक्कम वसूल केल्याचे बोलले जाते आर्वी तालुक्यातील बचत गटाच्या महिलांचा सोबत वाढोणा ,बेढोना, राजनी सुकळी बाई , बेढोना काटोल तालुक्यातील भारसिंगी, आष्टी तालुक्यातील भिष्णूर त्याचप्रमाणे आर्वी तालुक्यातील बेल्लारा ,अंजी, खेरगाव ,शिरजगाव व काटोल च्या पंचवटी परिसरात तालुका सावनेर पाटणसावंगी येथील बचत गटाच्या महिलांसोबत तुम्हाला कर्ज देतो अशी आमिष दाखवून मोठ्या प्रमाणात रक्कम त्या महिलांचे जवळून वसूल केल्याचे आरोपीकडून कबूल करण्यात आले आहे.

आरोपी जवळून अनेक गावच्या महिलांचे कागदपत्र मोटर सायकलच्या बनावटी नंबर प्लेट , ६ सिम कार्ड चार बनावटी आधार कार्ड ,बनावटी रबरी स्टॅम्प, डुप्लिकेट पॅन बनविण्याकरिता महिलांना पॅन कार्ड चे फार्म च्या ५० प्रती व अनेक गावातील महिलांना कर्ज देण्याबाबतचा दिखावा करणारे कागदपत्र व त्या महिलांचे फोटो जप्त करून आरोपी विरुद्ध कलम ४२०, ४०६ अधिक ३४ कायम करून पुढील तपास ठाणेदार संजय गायकवाड यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपनिरीक्षक योगेश चाहेर करीत आहे.