Home महाराष्ट्र “शहिद पोलीस वारसांना अनुकंपा तत्वावर शासन सेवेत तात्काळ समाविष्ट करा” –  डॉ.संघपाल...

“शहिद पोलीस वारसांना अनुकंपा तत्वावर शासन सेवेत तात्काळ समाविष्ट करा” –  डॉ.संघपाल उमरे

146

मा.राज्यपाल महा.राज्य यांना निवेदन…..!

➡️ पोलीस मित्र परिवार समन्वय समिती महाराष्ट्र राज्य अध्यक्ष डॉ.संघपाल उमरे यांच्या नेतृत्वाखाली संपुर्ण महाराष्ट्र राज्यात सर्व जिल्हा व तालुका प्रतिनिधी पोलीस दल व महाराष्ट्रातील सर्व संरक्षण दल व सर्व सामन्य नागरिकांच्या न्याय हक्कसाठी समितीचे महाराष्ट्र राज्यातील सर्व पदधिकारी लढा देत आहे याचेच औचित्य साधुन ,  दि.१६/२/२०२१ ला समितीचे महाराष्ट्र राज्य अध्यक्ष डॉ.संघपाल उमरे,महाराष्ट्र राज्य सचिव विनोद पत्रे,अमरावती विभागिय प्रमुख मनिष गुडधे यांनी मा.भगतसिंहजी कोश्यारी राज्यपाल महाराष्ट्र राज्य यांची राजभवन मुंबई येथे प्रत्यक्ष भेट घेऊन महाराष्ट्रातील पोलीस विभाग,एस.आर.पी.एफ.व सर्व संरक्षण दलातील अधिकारी कर्मचारी कुंटुबिंयाची,आरोग्याची,व जिवाची पर्वा नकरता, मुलाच्या शिक्षणाकडे लक्ष न पुरविता व कुटुबिंयान सोबत कोणतेही सण उत्सव साजरे न करता सतत १६ ते १८ तास सेवा देत आहेत.या विभागातील अधिकारी-कर्मचारी स्वत:चा जिव धोक्यात घालुन प्रत्यक्ष कर्तव्य बाजवत असतांना नक्षलवादी/आतंकवादी/दरोडेखोर/समाज विघातक यांच्या हल्ल्यात/कारवाईत मृत्युमुखी पडल्यास सरसकट ५० लाख रुपयाचा विमा व शासन निर्णय क्र. : अकंपा १२१७/प्र.क्र.१०२/आठ/दि.२१ संप्टेंबर २०१७,व १०℅ सुधारित शासन निर्णय १ मार्च २०१४ परिपत्रकानुसार सर्व प्राथम्याने त्यांच्या वारसांना तात्काळ शासन सेवेत समाविष्ट करुन शाहिद चा दर्जा देण्यात यावा सोबतच अर्जित रजा व मासिक रजा वेळेत मिळावी,राहण्यासाठी क्वार्टरची सुसभ्य सोय त्यामध्ये पाणी व विजेची सोय,रात्रकालीन ड्यूटीवर असलेल्या महिला कर्मचाऱ्यांना बसण्यासाठी स्वतंत्र रुम,चेंजिग रुम,व स्वतंत्रता शौचालयाची सोय,व पोलीस मेघा भरती घेऊन सतत १६ ते १८ तासाचा सेवेचा ताण कमी करण्यासंबधी व ईतर समस्या चे निवारण लवकरात-लवकर करण्यात यावे यासाठी मा. राज्यपाल महाराष्ट्र राज्य यांना निवेदन देण्यात आले.