Home विदर्भ यवतमाळ तालुक्यातील येळाबारा येथील सरपंच पदी सौ. अंजना मेश्राम, तर उपसरपंच पदी...

यवतमाळ तालुक्यातील येळाबारा येथील सरपंच पदी सौ. अंजना मेश्राम, तर उपसरपंच पदी सौ. माया इंगोले यांची निवड..!

226

अयनुद्दीन सोलंकी,

घाटंजी / यवतमाळ – यवतमाळ तालुक्यातील सर्वात महत्त्वाची समजली जाणारी येळाबारा येथील ग्राम विकास आघाडीच्या सरपंच पदी सौ. अंजना श्रावण मेश्राम, तर उपसरपंच पदी सौ. माया धनंजय इंगोले यांची निवड करण्यात आली.
▶️ येळाबारा येथील ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत अविभाऊ ठाकरे, दिलीप जगताप, माजी सरपंच मिलींद कवाडे, परिक्षित इंगोले, विनोद रामगडे, अक्षय पायताडे, विलास मडावी, उमेशराव मानकर, माणिक मडावी, लक्ष्मण पांगुळ, रामा पांगुळ, गणेश पेंदोर, नामदेवराव ठाकरे आदींनी अतिशय चांगले व कुशल नेतृत्व करुन येळाबारा येथील ग्राम विकास आघाडीचे पँनल निवडून आणले. या साठी सर्वांनी अथक परिश्रम घेऊन आपल्या उमेदवारांना भरघोस मतांनी निवडून आनले.
▶️ या निवडणुकीत चंद्रमणी कवाडे, मनोज नगराळे, कुंदन निखाडे, कपील खोंडे, उत्तम भुजाडे, दिप मोरे, महेश टिपले, विशाल कवाडे, प्रमोद वाघमारे, प्रफुल नगराळे, अविनाश कांबळे, शंकर वैरागडे, कुंदन पाझरे, अजय वाळके, कुणाल वानखेडे, मंगेश वानखेडे, रवींद्र वानखेडे, रोहीत वानखेडे, अण्णा मानकर, श्रीधर शंभरकर, श्रीधर राऊत, अतुल वानखेडे, सूरज कवाडे, आकाश प्रजापती, यशवंत टिपले, रोशन निखाडे, गोलू पाईकराव, रंगिला ढोले, संजय कामतकर, राहुल पाईकराव, गणेश परीसे, बादल भरणे, अरविंद खोंडे ईत्यादींनी ग्रामपंचायत निवडणूकीत मोलाची कामगिरी बजावली. विशेष म्हणजे येळाबारा ग्रामपंचायतचे माजी सरपंच मिलींद कवाडे यांनी येळाबारा येथील ग्रामपंचायत पुनश्च आपल्या ताब्यात ठेवली, हे येथे उल्लेखनीय.