Home जळगाव पत्रकार दमदाटी प्रकरणी धरणे आंदोलन ला उपविभागीय पोलीस अधिकारी ची भेट चौकशी...

पत्रकार दमदाटी प्रकरणी धरणे आंदोलन ला उपविभागीय पोलीस अधिकारी ची भेट चौकशी व कार्यवाही चे आश्वासन

206
0

खासदार रक्षा खडसे भेट व आमदार चंद्रकांत पाटील यांच्याशी संपर्क केला असता पोलीस अधीक्षकना आठ दिवसात कार्यवाही करण्याचे आश्वासन

रावेर (शरीफ शेख)

जळगाव जिल्ह्यातील बोदवड पोलीस ठाण्यात पत्रकार गोपाल व्यास यांना दमदाटी करत पोलीस ठाण्यात आल्यास पाहून घेईल असा दम देऊन दमदाटी करणारे पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड यांच्या निषेधार्थ दि.१७ रोजी दुपारी १२ वाजेपासून काळ्या फिती लावून तहसीलदार कार्यलय समोर पत्रकार संघ कडून उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष प्रविण सपकाळे यांच्या मार्गदर्शनाखाली धरणे आंदोलन करण्यात आले होते,

सदर आंदोलन स्थळी खासदार रक्षा खडसे यांनी भेट देत पत्रकार सोबत अशी वागणूक करणाऱ्या पोलीस निरीक्षक चे कृत्य लोकशाही ला हानिकारक असून या संदर्भात जिल्हा पोलिस अधिक्षक यांना कार्यवाही करण्याचे पत्र देणार असल्याचे सांगितले,

तर आमदार चंद्रकांत पाटील यांनी येत्या दहा दिवसात कार्यवाही करण्याचे आश्वासन महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष प्रविण सपकाळे यांना दिले,
त्यानंतर मुक्ताईनगर उपविभागीय पोलीस अधिकारी नरेंद्र पिंगळे यांनी धरणे आंदोलन स्थळी भेट देत सदर चौकशी करून अहवाल देणार असून कार्यवाही चे आश्वासन दिले, तर तहसीलदार प्रथमेश घोलप यांना निवेदन देत सदर धरणे आंदोलन कार्यवाही च्या आश्वासन वर थांबवण्यात आले असून सदर या प्रकरणी जिल्हा पोलिस अधीक्षक यांनी येत्या काही दिवसात दखल न घेतल्यास जिल्हा पोलिस अधीक्षक कार्यलय समोर धरणे आंदोलन करण्याचे प्रविण सपकाळे यांनी देण्याचे सांगत आंदोलन थांबवण्यात आले, सदर आंदोलन मध्ये महेंद्र पाटील, पुरुषोत्तम गड्डम, नाना पाटील, गोपीचंद सुरवाडे, गणेश पाटील, विनोद शिंदे, अर्जुन आसने, नितीन चव्हाण, जितेंद्र गायकवाड, अमोल व्यवहारे,विकास पाटील, राजेंद्र शेळके, जाफर मण्यार, असिफ बागवान,जाफर मण्यार, तेलंग, व बारा बलुतेदार संघ चे रविंद्र बावस्कर, राष्ट्रवादी चे माजी तालुकाध्यक्ष लालसिंग पाटील,शेतकरी संघटनेचे तालुकाध्यक्ष पुरुषोत्तम पाटील, यांचा ही पाठिंबा दिला.