Home विदर्भ ना. संजय राठोड यांची बदनामी आम्ही खपून घेणार नाही.जुनेद शेख चा विरोधकांना...

ना. संजय राठोड यांची बदनामी आम्ही खपून घेणार नाही.जुनेद शेख चा विरोधकांना अल्टीमेट..

337

यवतमाळ – पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणामुळे वादाच्या भोवऱ्यात सापडलेले वनमंत्री आणि शिवसेना नेते संजय राठोड यांना विरोधकानी राजकारणातून हद्दपार करण्याचा षडयंत्र रचला आहे. विरोधकांना कोणतेच काम उरले नसून कोणाचे पाय ओढायचे हेच त्याना कामे उरली आहे.

परंतु महाराष्ट्र राज्य चे वनमंत्री तथा यवतमाळ जिल्हा चे पालकमंत्री असलेले ना. संजय राठोड हे चांगला नेतृत्व असून त्यांचा राजीनामा मुख्यमंत्री स्वीकारणार नाही मला असे वाटते.

*कोण आहे पूजा चव्हाण ?*

मूळची परळीची असलेली 22 वर्षाची पुजा चव्हाण पुण्यात शिकण्यासाठी आली होती. तिच्या भावासोबत ती पुण्यातल्या हडपसर भागात रहात होती. रविवारी मध्यरात्री 1 च्या आसपास तिनं सोसायटीच्या तिसऱ्या मजल्यावरुन उडी मारली. हॉस्पिटलमध्ये नेत असतानाच तिचा जीव गेला. महमंदवाडी परिसरातल्या हेवन पार्कमध्ये ही घटना घडली. त्यानंतर दुसऱ्या दिवशी तिच्या आत्महत्येचा आणि विदर्भातल्या एका मंत्र्याचा संबंध असल्याची चर्चा सोशल मीडियावर सुरु झाली. प्रेमसंबंधातूनच पुजानं स्वत:ला संपवल्याचं बोललं जाऊ लागलं. पण पुजाच्या आत्महत्येनंतर कुठलीही चिठ्ठी किंवा इतर मेसेज असलेलं काही सापडलेलं नाही. पोलीसांनीही तशी काही माहिती दिलेली नाही.

*ऑडिओ क्लिपमधून उलगडा ?*

पूजा चव्हाणच्या आत्महत्येशी संबंधीत काही ऑडिओ क्लीप व्हायरल झाल्या आहेत. त्या त्याच प्रकरणाशी संबंधीत आहेत का याचाही खुलासा किंवा माहिती पोलिसांनी दिली नाही.

*कोण आहेत संजय राठोड?*

संजय राठोड हे शिवसेनेचे विदर्भातील बडे नेते आहेत

शिवसेनेचे नेते संजय राठोड हे पहिल्यांदा 2004 साली यवतमाळमधील दिग्रस विधानसभा मतदार संघातून विजयी झाले.

त्यानंतर 2009 आणि 2014 अशा दोन्ही वेळा पुन्हा संजय राठोड आमदार म्हणून विधानसभेत गेले.

फडणवीसांच्या 2014 साली राठोड यांच्याकडे यवतमाळच्या सहपालकमंत्रिपदासह महसूल राज्यमंत्रिपदाची धुरा सोपवण्यात आली.

2019 मध्ये जेव्हा महाविकास आघाडीचं सरकार आलं तेव्हा, त्यांच्याकडे वने, आपत्ती व्यवस्थापन, मदत आणि पुनर्वसन मंत्रिपदाचा भार सोपवण्यात आला.

*अल्टीमेट देणारा जुनेद शेख कोण?*

जुनेद शेख हा बाळासाहेब यांचा सच्चा शिवसैनिक मुस्लिम मावळा असून बोरी अरब येथील राहतो.
तालुका दारव्हा दिव्यांग संघटने साठी काम करतो सामान्य नागरिकांना येणारी अडचण त्वरित निकाली काढतो…