Home मराठवाडा लग्न सोहळ्याच्या निमित्ताने तब्बल ३२ वर्षांनंतर वर्गमित्र आले एकत्र

लग्न सोहळ्याच्या निमित्ताने तब्बल ३२ वर्षांनंतर वर्गमित्र आले एकत्र

498

जालना / घनसावंगी-स्पर्धेच्या, इंटरनेटच्या जमान्यात आज श्वास घ्यायलाही वेळ नाही,अशी परिस्थिती आहे.अशा धावपळीच्या जीवनात १९८७-८८ या शैक्षणिक वर्षांत शालांत परीक्षेत वर्गमित्र तब्बल असलेले सवंगडी लग्न सोहळ्यात एकत्र आल्याने नव्या जुन्या आठवणींना बहर आला.

जालना जिल्ह्याच्या घनसावंगी तालुक्यातील कुंभार पिंपळगाव येथील श्री सरस्वती भुवन विद्यालयात ३२ वर्षांपूर्वी १९८७-८८ साली दहावीच्या वर्गातील वर्गमित्र असलेले,आज १६ फेब्रुवारी रोजी सायंकाळी बिलोरे आणि जंगले परिवार यांचा विवाह सोहळा होता.दैनिक ‘महाभारत’ चे पत्रकार लक्ष्मण बिलोरे यांची कन्या चिसौकां भाग्यश्री आणि भेंड बुद्रुक ता.गेवराई , जिल्हा बीड येथील शिवाजीराव जंगले यांचे चिरंजीव अविनाश यांच्या मध्ये विवाह सोहळा संपन्न झाला .या लग्न सोहळ्याच्या निमित्ताने बिलोरे यांचे वर्गमित्र सतीश सोळंके,अंगद अंबुरे,रमेश निर्वळ, बळीराम नाईक,चत्रभुज आनंदे, राधेश्याम धूत, चत्रभुज काळे, गणेश कंटुले, आबासाहेब डावरे, गणेश कंटुले, रामदास शिलवंत,शेख जलील हे या निमित्ताने एकत्र आले , जुन्या आठवणींना उजाळा दिला. मैत्रीची पकड अधिक घट्ट केली.

हे पण वाचा
बिलोरे आणि जंगले परिवारातील या लग्न सोहळ्यात विविध क्षेत्रातील मान्यवर, वकिल, पत्रकार,डाॅक्टर्स,संत,महंत , वारकरी संप्रदायातील संतमंडळीं,भजनी मंडळ गणेश मंडळ, धर्मवीर संभाजी राजे प्रतिष्ठान, मित्र परिवार ,जिल्हा परिषद मा.सदस्य शामनाना उढाण, दिपकशेठ उबाळे, सामाजिक कार्यकर्ते रामेश्वर लोया, संपादक रविंद्र सुरडकर आणि टीम,स्थानिक पत्रकारमित्र ,विष्णु महाराज आनंदे,ज्ञानेश्वर महाराज आनंदे,विष्णु पोलिस पाटील,भरतराव कंटुले, रमेशदादा यांनी उपस्थित राहून शुभेच्छा दिल्या , लग्न सोहळ्यात उपस्थित राहिल्या बद्दल तसेच काही अपरिहार्य कारणास्तव‌ न येता ज्यांनी शुभेच्छा दिल्या या सर्वांचे बिलोरे – जंगले परिवाराने आभार व्यक्त केले.