Home विदर्भ घाटंजी तालुक्यात कोविड-१९ वर लसीकरण कार्यक्रमाला सुरुवात…

घाटंजी तालुक्यात कोविड-१९ वर लसीकरण कार्यक्रमाला सुरुवात…

184
0

यवतमाळ / घाटंजी :-  देशासह अख्ख्या जगात थैमान घातलेल्या कोरोना या महामारी मुळे जनजीवन विस्कळित झाले होते. यावर मोठ्या प्रयत्नानंतर शासनाने लसीकरणास सुरुवात केली आहे. याचाच भाग म्हणून दिनांक ९ फेब्रुवारी मंगळवार ला घाटंजी येथिल ग्रामीण रुग्णालय येथे तहसीलदार पूजा माटोडे यांच्या अध्यक्षते खाली लसीकरणाच्या सुरुवातीचे उदघाटन कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.

येथिल आयोजित कार्यक्रमात सर्व प्रथम या लसीकरणा बद्दल माहिती देवून आरोगयवर्धिनी च्या प्रतिमेचे पूजन करून दीप प्रज्वलन करण्यात येवून उपस्थित मान्यवरांचे स्वागत संभारंभाचा कार्यक्रम घेण्यात आला. त्यानंतर कोविड-१९ लसीकरण केंद्राचे नगराध्यक्षा नयनाताई ठाकूर यांच्या हस्ते रिबीन कापून लसीकरणाला सुरुवात करण्यात आली. सर्व प्रथम भरत शर्मा यांना लसीकरण करण्यात आले. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून नगर परिषदेचे मुख्याधिकारी अमोल माडकर, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. संजय पुराम, डॉ. आशिष गजभिये यवतमाळ, सहाय्यक पोलीस निरीक्षक किशोर भुजाडे, वैद्यकीय अधिकारी डॉ. निरज कुंभारे डॉ. धात्रक, सुधाकर अक्कलवार, पत्रकार संघटनेचे अध्यक्ष राजू चव्हाण, अनंत नखाते, पांडुरंग निवल, मुकेश चिव्हाने, संजय ढवळे, अमोल नडपेलवार, कुणाल तांगडे हे होते. याक्षणी जिल्हा शल्य चिकित्सक तरंगतुषार वारे यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. यावेळी आरोग्य विभागाचे डॉ. गावंडे, डॉ. आशिष राठोड, डॉ. फुलमाळी, डॉ. खरतडे, डॉ. मानकर, रवींद्र खांडरे, रमेश आडे, अविनाश शेंडे, नितीन ढवळे, हरेंद्र भगत, भाऊ सारडे, भाऊ डोंगरे, ताई पोटफाडे, ताई ठाकरे, सपना कोकाटे, स्वाती मेश्राम, ताई झोबाडे, चेतन डहाके, खंडू गायकवाड, राजू परीहार, विजय गडे, प्रविण निमकर, प्रेमदास साखरे, राजु निमकर, रुपाली घोरदडे, शिल्पा पांगुळ, तेजस्विनी पाठेन, सरोज केनेकर, सागर परोवटे, सुनिल जगताप डॉ. गावंडे इत्यादी कर्मचारी उपस्थित राहून लसीकरणाचा कार्यक्रम यशस्वी पार पाडला. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन समुपदेशक सुनिल जगताप यांनी केले.