Home नांदेड धर्माबाद येथील लाचखोर कृषी पर्यवेक्षक लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात.

धर्माबाद येथील लाचखोर कृषी पर्यवेक्षक लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात.

231

मजहर शेख, नांदेड

पाच हजार ची लाच घेताना रंगेहात पकडले.

नांदेड /धर्माबाद,दि :१०:- धर्माबाद येथील एका शेतकऱ्याला ठिबक संचावर मिळणाऱ्या अनुदानाचा लाभ मिळवून देण्यासाठी धर्माबाद येथील लाचखोर कृषी पर्यवेक्षक दिपक हनवते वय 57 याला मंगळवार दि,९ फेब्रुवारी २०२१ रोजी रात्री आठ च्या सुमारास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडून. त्याच्याविरुद्ध धर्माबाद पोलीस ठाण्यात लाचेचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तक्रारदार यांना ठीबक संचावर मिळणाऱ्या अनुदानाचा लाभ मिळवून देण्यासाठी पाच हजार रुपयाची लाचेची मागणी केल्याने.तक्रार दार शेतकऱ्याने लाचलुचपत प्रतिबंधक विभागात तक्रार दिल्याने पडताळणी दरम्यान लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून कारवाईत पंचांसमक्ष लाचखोर कृषी पर्यवेक्षक तालुका कृषी अधिकारी कार्यालय धर्माबाद दीपक हनवते( कोळीकर) वय 57 वर्ष, रा. रायगड नगर एमजीएम कॉलेजच्या बाजूस नांदेड यांनी पाच हजार लाच स्वीकारताना रंगेहात पकडण्यात आला. त्याच्याविरुद्ध पोलीस निरीक्षक एसएल नितनवरे ला.प्र.वि. यांच्या फिर्यादीवरून धर्माबाद पोलीस ठाण्यात लाचेचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या सापळा कारवाईत पोलीस अधिक्षक, कल्पना बारवकर, ला. प्र. वि. नांदेड परिक्षेत्र नांदेड.अपर पोलीस अधीक्षक,अर्चना पाटील, पोलिस उपअधीक्षक, विजय डोंगरे, यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक एसएल नितनवरे, ACB नांदेड टीम पोना किसन चिंतोरे , हनुमंत बोरकर ,पोकॉ अमरजीत सिंग चौधरी चालक पोना मारोती सोनटक्के यांनी परिश्रम घेतले.