Home परभणी देऊळगावं दुधाटे ग्रामपांचायतीच्या सरपंचपदी ललिताबाई उत्तमराव कांबळे तर उपसरपंच पदी डिगंबर दुधाटे...

देऊळगावं दुधाटे ग्रामपांचायतीच्या सरपंचपदी ललिताबाई उत्तमराव कांबळे तर उपसरपंच पदी डिगंबर दुधाटे यांची निवड

137
0

परभणी  – प्रतिनिधी

पूर्णा तालुक्यातील देऊळगाव दुधाटे ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी ललिताबाई उत्तमराव कांबळे यांची तर उपसरपंच पदी डिगंबर संभाजी दुधाटे यांची बिनविरोध निवड करण्यात आली. सोमवार दि.8 रोजी करण्यात आली. दुपारी 2 वाजता निवडणूक निर्वाचन अधिकारी जि.टी.रणवीर,ग्रामसेवक पोटे यांच्या उपस्तिथीत नवनिर्वचित सदस्यांतुन सरपंच व उपसरपंच निवडीसाठी सभा घेण्यात आली.सरपंच व उपसरपंच पदासाठी नामनिर्देशन दाखल करण्यासाठी सकाळी 10 ते 12 वाजेपर्यंत चा वेळ दिला होता.त्या दरम्यान जनशक्ती ग्रामसमृद्धी पॅनलकडून निवडणूक लढवून विजयी झालेल्या सर्वच्या सर्व सदस्यापैकी सरपंचपदासाठी ललिताबाई उत्तमराव कांबळे यांचा एकमेव अर्ज दाखल करण्यात आला.सदरील पद हे अनुसूचित जातीसाठी राखीव असल्याने त्यांच्या विरोधात कोणताही उमेदवार आला नाही त्यामुळे त्यांची बिनविरोध निवड जाहीर करण्यात आली. तर उपसरपंच पदासाठी याच पॅनलकडून विजयी झालेले डिगंबर संभाजीरावं दुधाटे यांचा ही एकमेव अर्ज दाखल करण्यात आला असल्याने त्यांची ही निवड बिनविरोध करण्यात आली. निवडी नंतर जनशक्ती ग्रामसमृद्धी पॅनल व देऊळगाव ग्रामस्थांच्या वतीने निवडणूक अध्याशी अधिकारी पी.जि.रणवीर,ग्रामविकास अधिकारी पोटे साहेब, बंदोबस्त कामी उपस्थित पोलीस अधिकारी व कर्मचारी, नवनिर्वचित सरपंच ललिताबाई डिगंबर कांबळे,उपसरपंच डिगंबर संभाजीराव दुधाटे,ग्रामपंचायत सदस्य विशाल आत्माराम दुधाटे, सरजाबाई भास्कर दुधाटे,उद्धव बालासाहेब दुधाटे, व्यनकटी गबाळे, काशिबाई लिंबाजी काळे,प्रभावती दीनानाथ दुधाटे, शेशीकेलाबाई नारायण पैके,गंगुबाई हरिभाऊ दुधाटे व जनशक्ती ग्रामसमृद्धी पॅनलचे प्रमुख दीनानाथ दुधाटे,तंटामुक्त समितीचे अध्यक्ष रंगनाथ दुधाटे,बालासाहेब दुधाटे,माणिक दुधाटे,उत्तमराव कांबळे,उद्धव दुधाटे,प्रदीप कांबळे, भुजंगराव दुधाटे,राजू मस्के यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्र संचलन भगवानराव दुधाटे यांनी तर आभार बालासाहेब दुधाटे,ऍड.राजेभाऊ दुधाटे यांनी मानले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी जनशक्ती ग्रामसमृद्धी पॅनलचे सर्व प्रमुख कार्यकर्ते व गावकऱ्यांनी परिश्रम घेतेले.