Home विदर्भ जवाहर सहकारी सूत गिरणी द्वारा डॉ रिपल राणे सन्मानित..

जवाहर सहकारी सूत गिरणी द्वारा डॉ रिपल राणे सन्मानित..

61
0

डॉ राणे यां आरोग्य सेवा व सामाजिक कार्य उल्लेखनीयच …श्री उगले, उपाध्यक्ष , जवाहर सहकारी सूत गिरणी धामणगाव (रे)

ईकबाल शेख

वर्धा – लोक नेते माजी खासदार माननीय दत्ताजी मेघे यांच्या जवाहर सहकारी सूत गिरणी धामणगाव रेल्वे येथे डॉ रिपल राणे यांना सुतगिरणीचे उपाध्यक्ष माननीय उगले साहेब यांचे हस्ते नुकतेच कोरोना काळात उत्कृष्ठ आरोग्य सेवा प्रदान करण्याबाबद व त्यांनी केलेल्या समाजकार्याबाबद सन्मानित करण्यात आले.

लायन्स क्लब धामणगाव दाता यांनी सर्व सदस्यांसाठी व लिओ क्लब च्या सर्व सदस्यांसाठी सुत गीरणीला औपचारिक भेट देण्याचे नियोजन केले होते .
या प्रसंगी लायन्स क्लब चे डिस्ट्रिक्ट ऍक्टिव्हिटी चैअरपरसन डॉ रिपल राणे हे प्रमुख पाहुने म्हणून उपस्थित होते व या वेळी डॉ राणे यांनी उपस्थितांना लायन्स क्लब व त्यांच्या सामाजिक उपक्रमाबद्दल सविस्तर माहिती दिली. लायन्स क्लब धामणगाव दाता द्वारा सुतगीरणीतील कर्मचारांसाठी सॅनिटायझर व मास्क चे वाटप करण्यात आले. यावेळी लायन्स क्लब दाता चे अधक्ष श्री कोटेकर, श्री योगेंद्र कोपुलवार ,श्री शिवकुमार कोठारी ,श्री पवन शर्मा ,डॉ. मापारी ,सूत गिरणीचे सर्व पदाधिकारी व इतर मान्यवर उपस्थित होते.