Home विदर्भ “सर्वज्ञ हाँस्पिटलचा स्तुत्त्य उपक्रम” , वाठोडा येथे डोळे तपासणीचे शिबिर सपंन्न झाले

“सर्वज्ञ हाँस्पिटलचा स्तुत्त्य उपक्रम” , वाठोडा येथे डोळे तपासणीचे शिबिर सपंन्न झाले

165

झाडगांव – बाबाराव ‌इंगोले 

अमरावती – धामणगांव रेल्वे तालुक्यातील वाठोडा गांवात राष्ट्रसंत गाडगे महाराज वाचनालयात सर्वज्ञ हाँस्पिटल धामणगांव रेल्वेच्या वतीने डोळे तपासणी शिबिराचे आयोजन दि.7 फेब्र.ला सपंन्न झाले.

या कार्यक्रमाचे अध्यक्ष सामाजिक कार्यकर्ते बाबा ठाकूर होते तर प्रमुख अतिथी मा.डॉ. साठे,मा.डॉ.मनिष अपतूरकर(एम.एम.बी.एस,डी.सी.एच.)बालरोग तज्ञ,डॉ.सविता अपतूरकर(बी.ए.एम.एस.)स्ञिरोग चिकित्सक प्रमुख होते.यावेळी सुनिल भाऊ सावंत,ज्ञानेश्वर सय्यांम,संदीप दावेदार,कीसनराव केने,जुनघरे,हरिदास कोरडे,सावंत,तायडे,वासूदेव दंबडे,संतोष नायताम,तसेच ग्राम पंचायतचे सदस्य शेळेके,दंबडे,सय्यांम यांची उपस्थिती होती.
यावेळी शिबिरामध्ये 0ते16 वयोगटातील लहान मुले-मूली व स्ञियां यांची तपासणी करण्यात आली.दरम्यान डोळ्यांच्या तपासणी शिबिरात 22पेशेंन्ट डॉ.साठे यांनी मोती बिंदूची केली व त्यांना मोफत औषधी वितरण करण्यात आली.यावेळी डॉ.मनिष अपतूरकर(एम.एम.बी एस,डी.सी.एच)बालरोग तज्ञ व डॉ.सविता अपतूरकर(बी.ए.एम.एस)स्ञिरोग चिकीत्सक यांनी वयोवृध्द पुरूष,महीला व मूला-मुलींची हिमोग्लोबिनची तपासणी करून औषधोपचार मोफत करण्यात आला.
या शिबिराला यशस्वी करण्याकरीता सामाजिक कार्यकर्ते बाबा ठाकूर व त्यांचे सहयोगी मिञ परीवाराने कार्यक्रमाचे आयोजन करून उत्कृष्टरीत्या संपन्न केला.