Home विदर्भ धावत्या गाडीतच झाला प्रवाश्याचा मृत्यू ,

धावत्या गाडीतच झाला प्रवाश्याचा मृत्यू ,

297
0

दुःखद घटना

ईकबाल शेख
वर्धा

तळेगांव (शा.पं.) : – नजीकच्या रानवाडी येथील कैलास रामसिंग राठोड वय ४० वर्ष हे पत्नि, आई व भावासोबत अमरावती येथे उपचाराकरीता गेले असता उपचार घेवुन परत येत असतांना बसमध्येच चिस्तुर नजीक अचानक त्यांचा मृत्यू झाला. घटना आज सोमवारी सायंकाळी ५ वाजताचे सुमारास अमरावती ते तळेगांव प्रवासादरम्यान घडली. प्राप्त माहितीनुसार, कैलास रामसिंग राठोड रा. रानवाडी यांच्या किडण्या निकामी झाल्याने मागील एक वर्षापासुन ते अमरावती येथे उपचाराकरीता जात होते अशातच आज ते पत्नि, आई व भावासोबत अमरावती येथे उपचाराकरीता गेले होते उपचार करुन अमरावती वरुन तळेगांव आगाराच्या बस क्रं. एम.एच.-४०-वाय ५००२ ने तळेगावला परत येत असताना चिस्तुर नजीक सायंकाळी ५ वाजताचे सुमारास प्रवासादरम्यान बसमध्येच त्यांचा मृत्यु झाला. सदर बस तळेगाव आगारात आली असता घटनेची माहिती तळेगांव पोलीस स्थेशनला दिली तेव्हा तळेगाव पोलीस बस स्थानका दाखल होवुन मृतकाला आर्वी येथील ग्रामीण रुग्नालयात उत्तरीय तपासनीकरीता पाठविले.सदर घटनेची नोंद तळेगाव पोलीसांनी घेतली असुन अधिकचा तपास तळेगांव पोलीस करीत आहे.