Home मुंबई तिने त्याला मिठीत घेतले अन , विपरितच घडले ,

तिने त्याला मिठीत घेतले अन , विपरितच घडले ,

493

 

मनाचा थरकाप उडवणारी घटना ,

 

अमीन शाह

: एकमेकांवर प्रेम व्यक्त करण्यासाठी खास अशा व्हॅलेंटाईन विकची सुरुवात झाली आहे. तर दुसरीकडे एका प्रियकराने आपल्या प्रेयसीला जिवंत जाळल्याची घटना मुंबईतील जोगेश्वरीमध्ये घडली आहे. धक्कादायक म्हणजे, पेटलेल्या अवस्थेत प्रेयसीने प्रियकराला मिठी मारली, त्यामुळे प्रियकराचा मृत्यू झाला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुंबईतील जोगेश्ववरी भागातील मेघवाडी पोलीस स्टेशनच्या हद्दीतील गांधीनगर परिसरात ही थरकाप उडवणारी घटना घडली आहे. विजय खांबे (वय 30) असं मृत तरुणाचे नाव आहे. विजयचे आपल्या मेव्हण्याच्या धाकड्या बहिणीशी गेल्या अडीच वर्षांपासून प्रेमसंबंध होते. विजयला त्याच मुलीशी लग्न करायचे होते. यासाठी त्याने लग्नाचा प्रस्ताव देखील मुलीच्या कुटुंबीयांना पाठवला होता. पण, त्याचा हा प्रस्ताव मुलीच्या आई-वडिलांनी फेटाळून लावला.  विजयला दारू पिण्याचे व्यसन जडले होते. त्यामुळे काही दिवसांनी मुलीनेही विजयशी लग्न करण्यास नकार दिला होता.विजयने पीडित मुलीला लग्न करण्यास हट्ट करत होता, त्यामुळे तो तिला त्रास देत होता. विजयच्या त्रासाला कंटाळून पीडितेनं एकेदिवशी आत्महत्येचा प्रयत्न केला होता. रुग्णालयात आठवडाभर  उपचार घेतल्यानंतर पीडित घरी आली होती. त्यावेळी विजय पुन्हा तिला भेटण्यासाठी गेला होता. त्याने आपल्यासोबत पेट्रोलची बाटली आणली होती.
पीडित घरी एकटीच असल्यामुळे विजयने संधी साधून घरात प्रवेश केला. विजय आणि पीडितेमध्ये पुन्हा वाद झाला. त्यानंतर त्याने आपल्यासोबत आणलेली पेट्रोलची बाटली पीडितेच्या अंगावर ओतली पेटवून दिले. तरुणीने जिवाच्या आकांताने आरडाओरडा करत होती, पण विजय हा दारातच उभे राहून सर्व पाहत होता. काही वेळानंतर तरुणीने पळत जात विजयला मिठी मारली. विजयने स्वत:ला सोडवण्याचा प्रयत्न केला पण तरुणीने त्याला काही सोडले नाही.
दोघेही पेटलेल्या त्याच अवस्थेत घराच्याबाहेर आले आणि कोसळले. त्यानंतर शेजाऱ्यांनी धाव घेऊन आग विझवली. दोघांनाही तातडीने जेजे रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. आगीत होरपळून विजय 90 टक्के भाजला होता. त्यामुळे त्याचा मृत्यू झाला. तर पीडित तरुणीची प्रकृती चिंताजनक असून मृत्यूशी झुंज देत आहे.
पीडित मुलीच्या भावाच्या तक्रारीवरुन मेघवाडी पोलीस स्टेशनमध्ये विजय खांबे विरोधात खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करण्यात आली आहे.