Home नांदेड देगलूर येथे शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी विविध संघटनानी मिळून केले चक्का जाम

देगलूर येथे शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी विविध संघटनानी मिळून केले चक्का जाम

218

 राजेश एन भांगे

केन्द्र शासनाने लागु केलेल्या शेतकरी विरोधी कृषी कायदे रद्द करण्यात यावें या मागन्यांसाठी दिल्ली मध्ये मागील काही महीन्या पासून चालू असलेल्या आंदोलनाला पाठिंबा म्हणून व सदरील जुलमी कायदा रद्द करण्यात यावा या मागणी साठी दि.६ फेब. रोजी पुकारण्यात आलेल्या देशव्यापी चक्काजाम आंदोलनाला पाठींबा देत देगलूर येथे नांदेड – हैदराबाद राज्य महामार्गावर सुमारे दोन तास चक्का जाम, रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.
तर यावेळी शेतकरी विरोधी काळे कायदे त्वरित रद्द करा, शेतमालाला हमीभाव कायदा लागू करा व तसेच शेतकरी विकासाचे धोरणे राबवा या प्रमुख मागण्या मांडण्यात आल्या व केंद्र शासनाच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करत परिसर दणाणून सोडले आणि मोठ्या प्रमाणात वाहतुकीची कोंडी केली.

यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा माजी नगराध्यक्ष अॅड मोहसीन अली काझी, शिवसेना देगलूर तालुका प्रमुख महेश पाटील अल्लापुरकर, संभाजी ब्रिगेड चे जिल्हा अध्यक्ष श्याम पाटील कुशावाडीकर, प्रहार संघटनेचे तालुकाध्यक्ष कैलास येसगे, युवासेना उपजिल्हाप्रमुख संतोष पाटील, डॉ हिंगोले शिवसेना शहरप्रमुख बालाजी मैलागिरे, विकास नरबाग, शिवसेना उपशहरप्रमुख संजय जोशी, संतोष कांबळे युवासेना पदाधिकारी विनोद सोनकांबळे उपशहरप्रमुख विनोद सोनकांबळे शिवसेना अल्पसंख्याक सेना जिल्हा प्रमुख रज्जाक धुंदी अल्पसंख्याक सेना तालुका प्रमुख नविदभाई अंजुम,युवा सेनेचे उल्लेवार बबलू, संगम पोसने, बालाजी दसरवाड, आदीसह शेकडो पदाधिकारी कार्यकर्ते शेतकरी शेतमजूर मोठया संख्येने उपस्थित होते.तर सुत्रसंचलन प्रहारचे कैलास येसगे यांनी केले यावेळी चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.