Home विदर्भ मच्छी घेवुन जाणारा ट्रक उलटला , “महामार्गावरील सत्याग्रही घाटातील घटना”

मच्छी घेवुन जाणारा ट्रक उलटला , “महामार्गावरील सत्याग्रही घाटातील घटना”

144
0

ईकबाल शेख

वर्धा / तळेगांव (शा.पं.) : नागपुर-मुंबई महामार्गावरील सत्याग्रही घाटामधील वळणावर ट्रकचे संतुलन बिघडल्याने मच्छी घेऊन जाणारा ट्रक रोडवर पलटी झाला. ही घटना शनिवारी पहाटे पाच वाजेच्या दरम्यान घडली. यात सुदैवाने कोणतीहि जिवित हानी झाली नाही. ट्रक व मच्छीचे मोठे नुकसान झाले.

मालवाहू ट्रक क्रमांक डब्लु.बी.-२५, के.३०६४ मच्छी घेऊन कलकत्यावरुन मुंबईला जात होता. शनिवारी पहाटे ट्रक पाच वाजेच्या दरम्यान सत्याग्रहि घाटात आला असता वळणावर ट्रकचे संतुलन बिघडल्याने रोडवर उलटला. सुदैवाने यात जिवित हानी झाली नाही. मात्र, त्यामधील मच्छी रोडवर बर्‍याच दुर पर्यत अस्ताव्यस्त पडल्याने मोठे नुकसान झाले. तर काहि काळ रहदारी ठप्प झाली होती. सदर घटनेची माहिती तळेगांव पोलीसांना मिळताच तळेगांव पोलीस स्टेशनचे कर्मचारी सुधीर डांगे, राजु शाहु, गजानन बावणे,अमोल इंगोले,अनिल ढाकणे, नितेश वाधमारे, रुपेश उगेमुगे, विजय उईके, आशिष नेवारे, रोशन कैलुके, बालाजी मस्के आदिंनी घटनास्थळी धाव घेत क्रेनच्या साहय्याने ट्रक रोडच्या कडेला घेवुन रहदारी सुरळीत केली. घटनेची नोंद तळेगांव पोलीसांनी घेतली असुन अधिकचा तपास पोलीस करित आहे.