Home विदर्भ पत्रकारांवर झालेल्या हल्ल्याची कारवाई करा पत्रकार संरक्षण समितीची मागणी  – जिल्हाधिका-यांना दिले...

पत्रकारांवर झालेल्या हल्ल्याची कारवाई करा पत्रकार संरक्षण समितीची मागणी  – जिल्हाधिका-यांना दिले मागण्यांचे निवेदन.

432

वर्धा जिल्हा परिषद अध्यक्ष सरिता गाखरे यांना निवेदन देताना पत्रकार संरक्षण समितीचे पदाधिकारी.


ईकबाल शेख

वर्धा – भूगाव येथील वृत्त संकलन करण्याकरिता गेलेल्या पत्रकारांवर सुरक्षा रक्षकांनी मारहाण करत हल्ला केला. तसेच वर्धा जिल्हा परिषदेने पत्रकारावर गदा आणणारा ठराव पारिते केल्याने लोकशाहीची चौथा स्तंभ धोक्यात आला असल्याने पत्रकार संरक्षण समितीच्या वतीने निवासी जिल्हाधिकारी श्रीमती मोरे यांना व जिल्हा परिषद अध्यक्ष सरिता गाखरे यांना मागणीचे निवेदन देण्यात आले.
वर्धा जिल्ह्यातील भूगाव येथील उत्तम गाल्वा कंपनीत दोन दिवसांपूर्वी मोठो स्फोट होऊन ३८ कामगार गंभीर जखमी झाले. या घटनेचे सविस्तर वृत्त संकलन करण्याकरिता गेलेल्या पत्रकारांवर येथील सुरक्षा रक्षकाने मारहाण केली. या घटनेमुळे पत्रकार क्षेत्रातील काम करणा-या पत्रकारांवर असुरक्षा निर्माण झाली आहे. त्यामुळे याकडे लक्ष देवून सुरक्षा रक्षकांवर पत्रकार संरक्षण कायद्याअंतर्गत कठोर करण्याची मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली.
जिल्हा परिषदेमधील अनेक गैरप्रकाराच्या सत्य बातम्या विविध वृत्तपत्रांमध्ये प्रकाशित करण्यात आल्या. या वृत्ताचा आकष मनात ठेवून काही परिषद सदस्यांना हाताशी धरून जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांना ठराव घेत जिल्हा परिषदेच्या अधिकारी, कर्मचारी संबंधित व्यक्तीविरुद्ध वृत्तपत्रात बातम्या आल्यास त्या वृत्तपत्रांविरुद्ध न्यायालयीन खटला चालविण्याचा ठराव चर्चाविना मंजूर केला. या मनमानी कारभार चालविण्यावर सखोल चौकशी करावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली. व दिल्ली येथे झालेल्या ट्रॅक्टर मोर्चात वृत्त संकलन करणा-या पत्रकारांवर खोटे गुन्हे दाखल करुन त्यांना तुरुंगात टाकण्याचा प्रकार घडलेला आहे. त्यामुळे या सर्व घटनेचा निषेध पत्रकार संरक्षण समितीच्या वतीने करण्यात आला. या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी न झाल्यास येत्या काही दिवसात पत्रकार संरक्षण समितीच्या वतीने तीव्र आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला.
निवेदन देतेवेळी पत्रकार संरक्षण समितीचे जिल्हाध्यक्ष रविराज घुमे, कोषाध्यक्ष शेख सत्तार, जिल्हा सचिव योगेश कांबळे, पत्रकार नरेंद्र देशमुख, पत्रकार गणेश शेंडे, सागर झोरे, गजानन बाजारे, सामचे प्रतिनिधी सुरेंद्र रामटेके यांच्यासह मोठ्या संख्येने पत्रकारबंधू उपस्थित होते.