Home विदर्भ आष्टी मोर्शी वरुड टी पॉईंट वर कार व दुचाकीचा भीषण अपघात

आष्टी मोर्शी वरुड टी पॉईंट वर कार व दुचाकीचा भीषण अपघात

58
0

रविन्द्र साखरे , आष्टी

वर्धा – शहराच्या शेवटच्या टोकावर असलेल्या मोर्शी वरुड टी पॉईंट वर कार व दुचाकी चा भीषण अपघात होऊन एक जण गंभीर जखमी झाला असल्याची घटना घडली असून या अपघातातील जखमी चा पाय तुटला असल्याची माहिती सुद्धा मिळाली आहे.

दिलीप महल्ले रा धामणगाव रेल्वे असे जोखमीचे नाव असून त्यांनी धामणगाव वरून आष्टी शहर क्रॉसिंग केल्यानंतर मोर्शी वरुड टी पॉईंट वर विरुद्ध दिशेने येणाऱ्या कार क्रमांक MH 31 Z 4533 ने त्यांना जबर धडक दिली यात ते गंभीर जखमी झाले, घटनास्थळावरून कार चालकाने पळ काढला पण नागरिकांनी तातडीने पोलिसांना माहिती दिल्याने तळेगांव पोलिसांनी सदर कार ला तळेगांव येथून ताब्यात घेतले आहे. अपघातात जखमी चा पाय तुटला असून पुढील उपचारासाठी त्यांना अमरावती येथे हलविण्यात आले आहे.