Home नांदेड देगलूर ते नांदेड बिना तिकीट पैसे घेऊन “तुफ्फान वेगाने धावु देणाऱ्या” अवैध...

देगलूर ते नांदेड बिना तिकीट पैसे घेऊन “तुफ्फान वेगाने धावु देणाऱ्या” अवैध खाजगी प्रवासी बसेस मुळे अपघाती जीवितहानी झाल्यास जबाबदार जिल्हा पोलीस व परिवहन प्रशासन ; सुज्ञ प्रवाशांचे मत

420

 राजेश एन भांगे

देगलूर हा आंध्र व कर्नाटक सीमेवरील नांदेड हैदराबाद महामार्गावरील वसलेला तालुका आहे.


परराज्यातून व देगलूर शहरातून रोजच्या रोज देगलूर ते नांदेड ये – जा करणाऱ्या व्यापारी, कर्मचारी व अधिकारी वर्गांची मोठी संख्या असुन त्यातच परिवहन मंडळाच्या बसेस च्या कमतरते मुळे की काय त्या बसेस कधीही वेळेवर नसल्याने बस स्थानकात तसंतास ताटकळत उभे ठाकावे लागते.
त्यामुळे पर्यायी व्यवस्था म्हणून अडला हरी गाढवाचे…म्हणत
सुज्ञ प्रवसी खाजगी प्रवासी बस कडे वळतो.
परंतु या खाजगी प्रवासी बस वाहकांची मुजोरी इतकी वाढली की तिकीट घेतात तर छापील बिल देत नाहीत व तसेच पुढच्या पॉइंट वरून एक – एक तास बस काढत नाहीत तर कुणी प्रवासी लोकांनी, महिलांनी उशीर होत आहे गाडी केव्हा काढणार म्हणून वाहकाला विचारणा केल्यास हे वाहक आपली मुजोरी दाखवत प्रवाश्यांना चार चौघात अरेरावीची उद्धट असभ्य भाषा वापरतात व एका तासा पर्यंत सीट वर बसलेल्या प्रवाशांची हुज्जत घालत खेडे पाड्याचे प्रवासी अक्षरशः शेळ्या मेंढ्या कोंबल्या सारखे कोंबतात व त्यातच नांदेड ते देगलुर दोन तासांचे अंतर एका तासात कापण्यासाठी चालकाला, प्रवासी राहिले काय अन खपले काय म्हणत नांदेड – हैदराबाद महामार्गावरील अवजड वाहनांच्या गर्दीतून मार्ग काढण्याची कसरत करत आपली अवैध प्रवासी खाजगी बस “जीवघेण्या, तुफ्फान वेगाने” पळवाविच लागते.
तरी हा महामार्गावरील रोज चालणारा घटनाक्रम नांदेड ते देगलूर पोलिस प्रशासक निमूटपणे राहून बघ्याची भूमिका का घेत असतील हे वेगळे सांगण्याची गरज न लागो.
या सर्व गैर प्रकारास जिल्हापोलिस प्रशासनाने गांभीर्याने घेणे गरजेचे आहे. कारण मागच्याच वर्षी एका खाजगी प्रवासी बस असेच तुफ्फान सुसाट वेगाने धावत असतानाच वंनाळी टोल नाक्याजवळ अपघात ( बस पलटी) होऊन पाच प्रवाश्यांचा हकनाक निष्पाप जीव गेला.
दुर्दैवाने पुन्हा अजून असेच दुर्दैवी जीवघेणा अपघात झाल्यास त्या झालेल्या जीवितहानीचे जबाबदार मांजर होऊन दूध पिणारे जिल्ह्याचे पोलिस व परिवहन प्रशासन असेल असे मत सुज्ञ प्रवासी व्यक्त करत आहेत.