Home विदर्भ केवळ पाच रुपयांसाठी जन्मदात्या बापाने मुलीस मारून टाकले

केवळ पाच रुपयांसाठी जन्मदात्या बापाने मुलीस मारून टाकले

341
0

 

खुनी बापास अटक ,

 

अमीन शाह

गोंदिया : खाऊसाठी पाच रुपये मागितल्याने वडिलांनी पोटच्या मुलीची हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार गोंदियात उघडकीस आली आहे. जन्मदात्याने 20 महिन्यांच्या मुलीचा दरवाजावर आपटून जीव घेतला. आरोपी पित्याला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.
गोंदिया जिल्ह्यातील तिरोडा तालुक्यात येणाऱ्या लोणारा गावात ही संतापजनक घटना घडली. 28 वर्षीय विवेक उईके हा तरुण मंगळवारी (दोन फेब्रुवारी) संध्याकाळी कामावरुन घरी परत आला. त्यावेळी त्याची पावणेदोन वर्षांची मुलगी वैष्णवी रडत होती.

मुलीच्या आईने खाऊसाठी पैसे मागितले
विवेकची पत्नी अर्थात चिमुकलीची आई वर्षा उईके हिने मुलीला खाऊ घेऊन देण्यासाठी पतीकडे पाच रुपये मागितले. त्यामुळे विवेकच्या संतापाचा पारा चढला. रागाच्या भरात त्याने मुलीला उचललं आणि घरातील दरवाजावर जोराने आपटलं.
आईची तक्रार, पित्याला अटक
वैष्णवीच्या डोक्याला गंभीर इजा झाली. तिला रुग्णालयात नेलं असता डॉक्टरांनी वैष्णवीला मृत घोषित केलं. त्यानंतर आईने तिरोडा पोलीस स्थानकात पतीविरोधात तक्रार दाखल केली. पोलिसांनी आरोपी पिता विवेक उईके याला अटक केली आहे. त्याच्याविरुद्ध मुलीच्या हत्येप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे