Home महत्वाची बातमी विद्यार्थींनी धाडसी स्वप्न बघून आपले भविष्य उज्वल करावे – उज्वला मांडवकर

विद्यार्थींनी धाडसी स्वप्न बघून आपले भविष्य उज्वल करावे – उज्वला मांडवकर

25
0

रावेर तालुक्यातील पहिली महिला सैनिक हिचा गौरव

रावेर , दि. १७ :- (प्रतिनिधी) – शिक्षण घेत असलेल्या महिलांनी स्पर्धात्मक आणि पुरुष प्रधान संस्कृतीत वावरत असतांना धाडसी स्वप्न बघून आपले भविष्य उज्वल करावे आणि सक्षम होऊन आपल्या कुटुंबासोबतच देश प्रगतीसाठी खारीचा वाटा उचलावा असे प्रतिपादन रावेर तालुक्यातील पहिल्या महिला सैनिक म्हणून निवड झालेल्या सौ उज्वला साळुंके / मांडवकर यांनी रावेर येथे माउली फौन्डेशन द्वारा आयोजित गौरव सोहळ्या प्रसंगी केले.
या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी नगराध्यक्ष दारा मोहम्मद हे होते उद्घाटन माजी नगराध्यक्ष पद्माकर महाजन यांच्या हस्ते करण्यात आले. प्रमुख अतिथी तहसीलदार अभिलाषा देवगुणे – दहीकर या होत्या तर प्रमुख पाहुणे केंद्र प्रमुख कामालोद्दिन शेख, गजाला शे तबस्सुम, दत्तात्रय मांडवकर माउली फौन्डेशन अध्यक्ष डॉ संदीप पाटील, सचिव डॉ सौ योगिता पाटील, श्रीराम फौन्डेशन सचिव दीपक नगरे आदी मान्यवर उपस्थित होते
प्रास्ताविकात दीपक नगरे यांनी महिला आणि त्यांची सुरक्षा याविषयावर सांगून सैनिकी शिक्षणाचे धडे घेणे काळाची असून महिलांनी आत्मसुरक्षेकडे लक्ष देण्याचे आवाहन केले,
डॉ सौ योगिता पाटील यांनी देखील आजच्या युगातील महिला हि चूल आणि मुल या पलीकडे गेली असून शिक्षण आणि धाडस यांच्या संगमाने नवीन इतिहास घडवीत आहेत. शे गजाला तबस्सुम यांनी भाषणात सांगितले की, समाज घटकातील वाईट प्रवृत्तीने महिलांना घातक ठरणाऱ्या व्यक्तीविरुद्ध लढायचे असेल तर आपण निर्भय झाले पाहिजे. माजी नगराध्यक्ष पद्माकर महाजन यांनी म्हटले की, महिला कुठल्याही क्षेत्रात काम करत असतील तर ते प्रामाणिक पणाने होत असते. देशसेवेसाठी सैन्यात महिला गेल्यास देश सुरक्षा मजबूत नक्कीच होईल असा आत्मविश्वास देखील त्यांनी बोलून दाखविला सत्कारमूर्ती सौ उज्वला यांनी म्निग्त व्यक्त करतांना त्यांच्या यशाचे श्रेय पती आणि घराच्या मंडळींना दिले आहे. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ गौरांगिनी कोळपकर यांनी केले तर आभार आदित्य इंग्लिश स्कूल प्राचार्य संजय पाटील यांनी मानले.

कार्यक्रम यशस्वीतेसाठी श्री संत ज्ञानेश्वर प्राथमिक विद्यालय मुख्याध्यापिका सौ मनीषा सोहनी यांच्या सह शिक्षक वैभव पाटील, नामदेव सपकाळे, मंगेश महाजन, राकेश गडे, ईश्वर शर्मा, कल्पना पाटील, दमयंती पाटील, गौरांगिनी कोळपकर, दिपाली पाटील, विजया पाटील, सुरेखा सलगर, वैशाली पाटील, प्रतीक्षा जोशी, लीला बावस्कार, जयश्री साळुंखे, ज्योती महाजन, शकुंतला पाटील, सोनाली पाटील, भाग्यश्री भावे, राजश्री पिंजालकर, शिला लोहार आदीसह कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.

Unlimited Reseller Hosting