Home नांदेड “प्रशासन आपल्या गावी” उपक्रमातून विविध कार्यालये व नागरिकांचा समन्वय साधून प्रशासन गतीमान...

“प्रशासन आपल्या गावी” उपक्रमातून विविध कार्यालये व नागरिकांचा समन्वय साधून प्रशासन गतीमान होणार -आमदार भीमराव केराम यांचे प्रतिपादन

62
0

मजहर शेख,नांदेड

नांदेड/किनवट,दि :३१:- शासनाच्या विविध योजना व अत्यावश्यक प्रमाणपत्र मिळणे हा नागरिकांचा हक्क आहे. त्यांची कामे विविध विभागाशी संबंधित असतात. ती पूर्ण करण्यास त्यांना विविध कार्यालयात पायपीट करावी लागते.

परंतु शासन निर्णयान्वये जिल्हाधिकारी डाॅ. विपीन इटनकर (भाप्रसे) यांच्या संकल्पनेतील “प्रशासन आपल्या गावी” या उपक्रमाच्या आयोजनातून विविध कार्यालयांचा एकमेकांशी व नागरिकांशी परस्पर समन्वय साधल्या जात आहे. त्यामुळे प्रलंबित कामे मंडळ स्तरावरच मार्गी लागून प्रशासन गतीमान होणार आहे. असे प्रतिपादन आमदार भीमराव केराम यांनी केले.
येथील तालुका कृषी कार्यालयात तालुका प्रशासनाच्यावतीने आयोजित “प्रशासन आपल्या गावी” या उपक्रमाच्या शुभारंभ प्रसंगी ते बोलत होते. यावेळी सहायक जिल्हाधिकारी तथा प्रकल्पाधिकारी कीर्तिकिरण पुजार (भाप्रसे), उपमुख्य कार्यकारी अधिकारी तथा तालुका सनियंत्रण समिती सदस्य व्ही.आर.पाटील, तहसिलदार उत्तम कागणे, नगराध्यक्ष आनंद मच्छेवार, पंचायत समिती सभापती प्रतिनिधी दत्ता आडे, उपसभापती कपिल करेवाड, पं. स. सदस्य निळकंठ कातले, गट विकास अधिकारी सुभाष धनवे, तालुका कृषी अधिकारी बालाजी मुंडे यांची प्रमुख उपस्थिती होती.
मान्यवरांच्या हस्ते ज्ञानदीप प्रज्वलीत करून “प्रशासन आपल्या गावी” या उपक्रमाच्या शुभारंभ करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन उत्तम कानिंदे यांनी केले.
यावेळी बोलतांना सहायक जिल्हाधिकारी तथा प्रकल्पाधिकारी कीर्तिकिरण पुजार म्हणाले की, मंडळ निहाय हा कार्यक्रम असल्याने विविध योजनांची माहिती प्रत्येक नागरिकांना मिळेल, त्यामुळे त्यांना लाभ घेता येईल. सर्व कार्यालय प्रमुखांनी सप्ताहभरातील कामाच्या नोंदी ठेवाव्या व दर शुक्रवारी संबंधित मंडळातील कामाचा निपटारा करावा.
यावेळी महसूल विभागाच्या वतीने आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याचे वारस कनाबाई शेषेराव राठोड व मालीबाई गंगाराम चव्हाण यांना धनादेश व जमीनहस्तांतरण दस्तऐवज, मलका नरसय्या सुदेवाड, हसिना गुलाबसिंग, दिव्यांग गंगाबाई सुभाष अंगीलवार यांना संजय गांधी निराधार योजना अनुदान, सुभद्रा कृष्णा सिडाम, विलास काशेटवार यांना राशनकार्ड, उल्हास सोमाजी पाटील , गजानन हुसकुकाडे यांना मिळकत, संजय गायकवाड, चंदण चव्हाण यांना जात प्रमाणपत्र,कृषी विभाग पंचायत समितीच्या वतीने रमेश मडावी, पद्माकर आरसोड यांना बायोगॅस शेगडी, विनोद मेश्राम यांना बिरसामुंडा कृषी क्रांती सिंचन विहीर धनादेश, रामराव राठोड यांना दारिद्रय रेषा खालील प्रमाणपत्र, शेख मैनोदीन यांना नमुना नं. 8, पशुसंवर्धन विभागाच्या वतीने मनीषा चौधरी यांना शेळीगट पुरवठा, अंबुबाई कुडमेथे, भाऊराव चव्हाण, श्रावण राठोड, नागोराव कुडमेथे, सुबोध सोनकांबळे, काळूराम लांडगेवाड या दिव्यांग लाभार्थ्यांना अनुदान वाटप, गणेश दासरवाड यांना जन्म प्रमाण पत्र व तालुका कृषी कार्यालयाच्या वतीने अनेक लाभार्थींना ठिबक, तुषार, शेडनेट वाटप, अशाप्रकारे प्रातिनिधीक स्वरूपात लाभार्थींना मान्यवरांच्या हस्ते योजनांचा लाभ देण्यात आला.
वैद्यकीय अधिक्षक डॉ. उत्तम धुमाळे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. संजय मुरमुरे, पशुधन विकास अधिकारी डॉ. सायन्ना आडपोड, गट शिक्षणाधिकारी अनिल महामुने, पोलिस निरीक्षक मारोती थोरात, भूमी अभिलेख उपअधिक्षक पेंदोर, बाल विकास प्रकल्प अधिकारी प्रफुल्ल बागल, वनपरिक्षेत्राधिकारी किशन खंदारे, मुख्याधिकारी निलेश सुंकेवार आदी कार्यालय प्रमुखांनी आपापल्या योजनांची फलके लावून माहितीचे दालन उघडले होते.
कार्यकमाच्या यशस्वितेसाठी नायब तहसिलदार सर्वेश मेश्राम, मोहम्मद रफीक, केंद्र प्रमुख रमेश राठोड, मल्लिकार्जून स्वामी, राम बुसमवार, रामेश्वर मुंडे, गोविंद पांपटवार, गजानन हिवाळकर, पं.स.चे सर्व विस्तार अधिकारी, विविध कार्यालयाचे अधिकारी व कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.